Ind vs Eng: यशस्वी जयस्वालने ठोकलं धमाकेदार शतक! ओव्हलवर इंग्लंडची अवस्था झाली बिकट

इंग्लंडविरुद्ध (India vs England) खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल ने (yashasvi jaiswal) कमालच केली. दुसऱ्या दिवशी त्याने एका दमदार षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी संयमपूर्ण फलंदाजी करत साऱ्यांची मने जिंकली. यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावात भक्कम शतक झळकावले.(Yashasvi Jaiswal smashed a solid century in the second innings)

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यशस्वी जयस्वाल ने शतक झळकावले होते. त्यानंतर मात्र त्यांच्या बॅटमधून शतक पाहायला मिळाले नव्हते.

आता पाचव्या सामन्याच्या दुसऱ्या डावात, जेव्हा टीम इंडियाला सर्वाधिक धावांची गरज होती, तेव्हा यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा पुढे सरसावला. त्याने अफलातून शतकी खेळी केली. दुसऱ्या दिवशी त्याने जलदगतीने धावा केल्या, तर तिसऱ्या दिवशी संयमाने फलंदाजी केली. त्याने 127 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार ठोकले. (He completed his century in 127 balls. In this innings, he hit 11 fours and 2 sixes)

Comments are closed.