IND vs ENG: 39 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडला, यशस्वी जयस्वालने इंग्लंडमध्ये रचला इतिहास!

Yashasvi Jaiswal Test Cricket Records: सध्या भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पहिला कसोटी सामना लीड्सच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान भारताचा सलामीवीर यशस्वी जायस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. या शानदार कामगिरीनंतर त्याने खास यादीतही स्थान मिळवलं आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी जयस्वालने शानदार शतक झळकावलं आणि खास रेकॉर्ड्सच्या यादीत स्थान मिळवलं. (Yashasvi Jaiswal century vs England)

लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी जयस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केलं. त्याने 159 चेंडूंत 16 चौकार आणि 1 षटकार मारत ही खेळी केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या (WTC) इतिहासातील हे त्याचं पाचवं कसोटी शतक ठरलं. कर्णधार शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्या बरोबरीने डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Jaiswal WTC record)

यशस्वी जायस्वाल आणि केएल राहुल यांनी लीड्समध्ये सर्वात मोठ्या सलामी जोडीचा रेकॉर्डही केला. दोघांमध्ये 92 धावांची भागीदारी झाली. त्यांनी 39 वर्ष जुना रेकॉर्ड मोडीत काढला. याआधी 1986 मध्ये सुनील गावसकर आणि के. श्रीकांत यांनी लीड्समध्ये 64 धावांची सलामी भागीदारी केली होती. (India opening record at Leeds)

यशस्वी जायस्वालचं परदेशात सलामीवीर म्हणून हे तिसरं शतक ठरलं. यामुळे त्याने रवि शास्त्री आणि वीनू मांकड यांच्या बरोबरीने घराबाहेर 3-3 शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. सुनील गावसकर 15 शतकांसह या यादीत अव्वल स्थानी आहे. केएल राहुलने परदेशात 5 आणि वीरेंद्र सेहवागने 4 शतकं झळकावली आहेत.

यशस्वी जायस्वालने इंग्लंडमधील आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावलं. तो इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील आपल्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटीत शतक झळकावणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. (Jaiswal century England debut)

Comments are closed.