IND vs ENG: यशस्वी जयस्वालने रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा एकमेव फलंदाज!

इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) इतिहास रचला आणि शानदार शतक झळकावण्यात यश मिळवलं. हे जयस्वालचं कसोटी क्रिकेटमधील सहावं शतक ठरलं. या शतकी खेळीनंतर त्यांनी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

जयस्वाल आता अशा एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे, ज्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर 300 हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या (2024/25) दौऱ्यात त्याने 391 धावा केल्या होत्या, तर इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत 344 पेक्षा अधिक धावा त्याने फटकावल्या आहेत.

तसेच, जयस्वालने ओपनर म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये एकूण 6 शतके ठोकली आहेत. 23 वर्षांच्या वयात टेस्ट क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तो आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत सर्वांत वर आहे दक्षिण आफ्रिका संघाचा ग्रीम स्मिथ, ज्याने 23 व्या वर्षी 7 शतके झळकावली होती.

23 व्या वर्षी सलामीवीर फलंदाजाने कसोटीमध्ये सर्वाधिक शतकं

ग्रॅमी स्मिथ- 7

यशसवी जयस्वाल- 6

ओव्हलमध्ये 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटवर 50+ धावा करणारा जयस्वाल हा तिसरा विदेशी सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी ही कामगिरी श्रीलंकेचा पथुम निस्सांका आणि वेस्ट इंडिजचा क्रिस गेल यांनी केली होती.

यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) 23 व्या वर्षी SENA देशांमध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी 50+ धावसंख्या करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. SENA देशांमध्ये त्याचा हा सातवा 50+ स्कोअर आहे. या यादीत सर्वात वर आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ज्यांनी 23 व्या वर्षी SENA देशांमध्ये एकूण 11 वेळा 50+ धावा केल्या होत्या.

Comments are closed.