IND vs ENG: इंग्लंडच्या मैदानावर यशस्वी जयस्वालचा ऐतिहासिक कारनामा, 11 वर्षांनी घडली अशी कामगिरी!

इंग्लंडच्या मैदानावर यशस्वी जयस्वालने (Yashsvi jaiswal) पहिल्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी केलेली आहे. हेडिंग्लेमध्ये खेळला जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावले आहे. त्याने 144 चेंडूत शतक झळकावले. इंग्लंडच्या मैदानावर पहिल्यांदा खेळत असलेल्या जयस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच धुवा उडवला. त्याने 16 चौकार आणि एक षटकार झळकावला. तसेच त्याने शतक झळकावत एक मोठा विक्रम त्याच्या नावावर केलेला आहे.

यशस्वी जयस्वालने शानदार फलंदाजी करत 144 चेंडूत शतक झळकावले. त्याच्या या खेळीदरम्यान तो चांगल्या लयीमध्ये खेळत होता. यशस्वी जयस्वाल इंग्लंडच्या मैदानावर पहिल्या डावात शतक झळकावणारा फक्त पाचवा भारतीय फलंदाज ठरलेला आहे. शेवटच्या वेळी हा कारणामा मुरली विजयने 2014 मध्ये केला होता. तसेच सौरव गांगुली यांनी 1996 मध्ये 101 धावांची शानदार पारी खेळली होती. यानंतर 11 वर्षानंतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने इंग्लंडच्या मैदानावर ही कामगिरी केलेली आहे.

यशस्वी जयस्वालने के एल राहुल सोबत मिळून टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. त्यांनी 91 धावांची भागीदारी रचली. राहुल 42 धावा करून बाद झाला तसेच साई सुदर्शन देखील खात न उघडताच परत गेला. त्यानंतर जयस्वाल आणि कर्णधार यांनी मिळून संघ सावरला.

Comments are closed.