टाळ्यांपासून ते टीकेपर्यंतचा प्रवास! टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरसोबत जानेवारी ते डिसेंबर 2025 प

गौतम गंभीर इयर एंडर 2025 : टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर नेहमीच चर्चेत असतो. 2024 मध्ये त्याने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी 2025 हे वर्ष संपता संपता अनेक अर्थांनी खास ठरले. या काळात टीम इंडियाने काही मोठ्या स्पर्धा आणि मालिका जिंकत यशाचा झेंडा फडकावला, तर काही ठिकाणी पराभवाची कडू चवही चाखावी लागली. याच वर्षात गौतम गंभीर काही वादांमुळेही चर्चेत राहिला. गौतम गंभीरसाठी 2025 हे वर्ष कसं ठरलं जाणून घेऊया…

हेड कोच गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील यशस्वी कामगिरी

1. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 विजय

गौतम गंभीरच्या कोचिंग कारकिर्दीतील पहिली मोठी स्पर्धा म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. तब्बल 12 वर्षांनंतर भारताने ही प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात टीम इंडियाने इतिहास घडवला.

2. इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर वर्चस्व

2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या घरच्या मैदानावरील व्हाईट-बॉल मालिकेत भारताने वर्चस्व गाजवलं. वनडे आणि टी20 या दोन्ही मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी लक्षवेधी ठरली.

3. आशिया कप 2025 – पाकिस्तानवर अंतिम सामन्यात मात

आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारताने ट्रॉफी आपल्या नावावर केली. टी20 संघात गंभीरने केलेले बदल भारतासाठी फायदेशीर ठरले.

4. वेस्टइंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत वर्चस्व

वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने संपूर्ण वर्चस्व राखलं. अहमदाबाद आणि दिल्ली येथे झालेल्या दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला. 2025 मध्ये गौतम गंभीर यांची ही पहिली कसोटी मालिका विजय ठरली.

5. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कमबॅक

कसोटी मालिकेतील पराभवानंतरही गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जोरदार पुनरागमन केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने वनडे मालिका 2-1 आणि टी20 मालिका 3-1 अशी जिंकली.

गौतम गंभीरशी संबंधित वाद आणि संघाची ढासळलेली कामगिरी

1. भारत–दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका वादग्रस्त

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका अनेक कारणांनी चर्चेत राहिली. या मालिकेत गौतम गंभीर याने संघाच्या संयोजनात वारंवार बदल केले. त्याचा फटका कोलकाता आणि गुवाहाटी येथे झालेल्या कसोटी सामन्यात बसला आणि टीम इंडियाला दोन्ही सामन्यांत दारुण पराभव स्वीकारावा लागला. याच कारणामुळे गौतम गंभीर वादांच्या भोवऱ्यात सापडले.

2. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अचानक निवृत्तीवर आरोप

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर चाहत्यांनी थेट गौतम गंभीरवर बोट ठेवलं. त्याच्या कार्यपद्धतीमुळेच या दोन्ही दिग्गजांनी कसोटीला अलविदा केल्याचा आरोप सोशल मीडियावर जोर धरू लागला, त्यामुळे गंभीर पुन्हा एकदा वादात सापडले.

3. संघनिवडीवरून सतत टीका

2025 मध्ये संघनिवडीमुळे गौतम गंभीर सातत्याने टीकेच्या केंद्रस्थानी राहिले. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने तब्बल पाच फिरकीपटूंसह संघ जाहीर केला होता. त्याचवेळी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत सरफराज खानला संधी न मिळाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याशिवाय हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना सर्व फॉरमॅटमध्ये सातत्याने संधी दिल्यानेही वाद निर्माण झाले.

4. स्प्लिट कोचिंगवरून पार्थ जिंदल यांच्याशी वाद

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका हरल्यानंतर गौतम गंभीर यांच्यावर तीव्र टीका झाली. याच दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदल यांनी ‘स्प्लिट कोचिंग’ची संकल्पना मांडली. यावर गौतम गंभीर यांनी कडवट शब्दांत प्रत्युत्तर दिलं. “ज्यांना क्रिकेटचं ज्ञान नाही, तेही आता काय आणि कसं करायचं हे सांगू लागले आहेत,” असं वक्तव्य करत त्यांनी वादाला आणखी चिथावणी दिली.

5. ओव्हल कसोटीपूर्वी पिच क्युरेटरशी वाद

इंग्लंड दौऱ्यात ओव्हल कसोटीपूर्वी गौतम गंभीर यांची पिच क्युरेटर ली फोर्टेस यांच्याशी जोरदार शाब्दिक चकमक झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर गंभीर पुन्हा एकदा मोठ्या कॉन्ट्रोव्हर्सीत अडकले.

हे ही वाचा –

BCCI on Gautam Gambhir : प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरची सुट्टी होणार?, अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.