पुढील दोन दिवस 13 जिल्ह्यांना तापमानवाढीचा धोका; मराठवाडा, विदर्भाला यलो अलर्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच देशभरात उत्तरेकडे उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. त्यातच पुढील दोन दिवस राज्यातील 13 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तापमानवाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठवाड, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचा यले अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 4३ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद होत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारी 12 ते 4 नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. यासोबतच जास्तीत जास्त पाणीही प्यावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. अकोला येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोला येथे 45.6 अंश सेल्सिअस तापमान होते.

नाशिक, जळगाव, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा, नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने नांदेड जिल्ह्याला 14 आणि 15 मे रोजी उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला.

जळगावमध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मे महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला असून आगामी काळा उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.