पाहुण्यांसोबत जेवायला बसली नाही म्हणून फ्रेंचाइजी मालकाने नोटीस बजावली, मॉडेल-अँकर येशा सागरसोब
येशा सागर: बांगलादेश प्रिमिअर लीग (Bangladesh Premier League) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलीये. सुरुवातीला बांगलादेश प्रिमिअर लीगमध्ये खेळाडूंच्या सॅलरीचा मुद्दा समोर आली होता. आता तर भारतीय वंशाच्या येशा सागरबाबत मोठी माहिती समोर आलीये. येशा सागरला (Yesha Sagar) बांगलादेश प्रिमिअर लीगचं (Bangladesh Premier League) अँकरिंग अर्ध्यावर सोडून येण्याची वेळ आली आहे. येशा सागरवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तिला नोटीस देखील बजावण्यात आलीये. त्यामुळे तिच्यावर बांगलादेश प्रिमिअर लीग अर्ध्यावर सोडून परतण्याची वेळ आलीये.
येशा सागर (Yesha Sagar) बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) 2025 मध्ये चटगाव किंग्ज संघाशी संलग्न होती, या संघासोबत तिने एक करार केला होता. एका बांगलादेशी न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सागरला फ्रँचायझीचे मालक समीर कादर चौधरी यांच्याकडून त्याच्या करारातील अटींचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर नोटीस मिळाली होती.
फ्रेंचाइजी मालकाने आत्तापर्यंत काय काय म्हटलंय?
चटगाव किंग्जच्या मालकाने समीर कादर चौधरी यांनी नोटीसमध्ये म्हटलं की, करारानुसार येशाने तिच्या कर्तव्यांचं पालन केलेलं नाही. तिने कर्तव्याचं पालन करण्यात कसूर केलीये. तिला अधिकृतरित्या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र तरिही ती डिनरसाठी आली नाही. याशिवाय तिने करार केलेले प्रमोशन शूट देखील पूर्ण केलेले नाही. येशाच्या अनुपस्थितीमुळे चटगाव किंग्जला आर्थिक नुकसान झालं आहे. शिवाय चटगाव किंग्जच्या प्रतिष्ठेला देखील ठेच पोहोचलीये. नोटीसला उत्तर द्यायचं सोडून येशाने टुर्नामेंटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.
कोण आहे येशा सागर?
येशा सागरचा जन्म पंजाबमध्ये झालाय. येशा उच्च शिक्षणासाठी 2015 मध्ये कॅनडामधील टोरंटोमध्ये गेली होती. तिने स्पोर्ट्स अँकर बनण्यापूर्वी मॉडलिंग आणि अभिनय क्षेत्रात कामाची झलक दाखवली होती. आत्तापर्यंत तिने ग्लोबल टी 20- कॅनडा, यूपी टी 20 लीग आणि बांगलादेश प्रिमिअर लीगसह अनेक लीगमध्ये होस्ट म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
येशा सागर पंजाबी, हिंदी आणि तेलुगूसह 30 हून अधिक गाण्यामध्ये झळकली आहे.. परमीश वर्माचा ‘चिरी उद का उड’ हा म्युझिक व्हिडिओ त्याच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओंपैकी एक आहे. अलीकडेच येशा सागरने गिल्ट विथ कपिल शर्मा नावाच्या म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे. येशा सागर ही एक फिटनेस प्रभावशाली देखील आहे आणि तिने मॅग्नम न्यूट्रास्युटिकल्स, प्रिसिजन न्यूट्रिशन आणि रिव्हाइव्ह सुपरफूड्स यांसारख्या आघाडीच्या फिटनेस ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.