पाणी नसताना बारामतीचा विकास झाला, त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन दापोली मतदारसंघाचा विकास करणार
योगेश कदम : बारामतीपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दापोली मतदारसंघाचा विकास करेन असं वक्तव्य गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलं. पाणी नसताना ज्या पद्धतीने तिथल्या नेत्यांनी बारामतीचा विकास केला, त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मी दापोलीचा विकास करणार असल्याचे ते म्हणाले. पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा आजवर हवा तसा विकास का झाला नाही? हे समजल नाही, अशी खंत योगेश कदम यांनी व्यक्त केली.
बंदरांचा विकास होणं महत्वाचं
जोपर्यंत कोकणाचा विकास होत नाही तोपर्यंत राज्याचे पर्यटन वाढणार नाही. पर्यटक वाढतील त्यावेळी इकडची कला आपोआप जपली जाईल असे योगेश कदम म्हणाले. दापोलीमधील कर्दे, हर्णे आणि मुरुड या तीन बीचवर पाच लाख पर्यटक दरवर्षी येतात. वर्षातले आठ महिने आपल्या दापोली तालुक्याचा बदल करणारे आहेत. त्यासाठी बंदरांचा विकास महत्वाचा असल्याचे मत योगेश कदम यांनी व्यक्त केले. नितेश राणे यांनी सुरु केलेली रोरो सेवा दापोलीत थांबत नाही. ती थांबण्यासाठी मी लवकर प्रयत्न करणार असल्याचेही योगेश कदम म्हणाले. माझं वय 40 वर्ष झालं असलं तरी मी वयाने मोठा झालो असे मानत नाही. अभिनेता देवदत्त नागे (जय मल्हार फेम ) यांना संबोधत योगेश कदम यांनी हे वक्तव्य केलं.
महत्वाच्या बातम्या:
योगेश कदम मंत्री झाले तरीही खेडमध्ये रस्त्यांची अवस्था वाईट, भाजपच्या माजी आमदारानं डिवचलं, रत्नागिरीत महायुतीत ठिणगी
आणखी वाचा
Comments are closed.