नीलम गोऱ्हेंनंतर रामदास कदमांच्या मुलाचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, ‘मातोश्री’वरील रेटकार्ड बाह
योगेश कदम:उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्या की ते एक पद देतात असं वक्तव्य केल्याने विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या .त्यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटातही नाराजीचा सूर उमटला .नीलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर आता राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या निशाणावर मातोश्री आल्याचं दिसतंय .लोकसभा , विधानसभा व पालिका निवडणुकांसाठी मातोश्रीचा वेगवेगळे रेट कार्ड असल्याचं ते म्हणालेत .राबणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट न देता गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं जायचं असा खळबळ जनक आरोप योगेश कदम यांनी केलाय .नीलम ताईंनी सांगितलेलं तथ्य डावलता येणार नाही असंही ते म्हणालेत . (Yogesh Kadam)
दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्याचा राजकारणात वेगाने उमटले .दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांनी नीलम गोरे यांच्या वक्तव्यावर आक्रमक भूमिका घेतली असून पुण्याच्या अलका चौकात खासदार संजय राऊत आणि विरोधात आंदोलन सुरू झालंय . नीलम गोरे यांच्या वक्तव्यावरून एकीकडे गदारोळ सुरू असतानाच राज्याच्या गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनी मातोश्रीवर निशाणा साधल्याने पुन्हा एकदा वाद ओढवण्याची चिन्हे आहेत . (Nilam Gorhe)
काय म्हणाले योगेश कदम ?
भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा होत असतील तर अशांवर कारवाई होईल .तुम्हाला इतकं पाकिस्तान आवडत असेल तर खुशाल जा पण भारतात हे सहन केला जाणार नाही .मातोश्री बाबत आमच्याकडे अनेक खुलासे आहेत .त्यांनी कधीही केले नाहीत .मात्र निवडणुकीबाबत किंवा तिकिटाबाबत सांगायचं झालं तर ,निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून चांगलं गिफ्ट देणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं जायचं .यामुळेच अनेक ठाकरेंना सोडून गेले .नीलम गोऱ्हे यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेऊन सुरक्षा दिली जाईल .गिफ्टच्या डिटेल मध्ये मी जाणार नाही .असे योगेश कदम म्हणाले .नीलम गोरेंच्या वक्तव्यानंतर योगेश कदम यांचा निशाण्यावरही मातोश्री आल्याचे दिसले .लोकसभा विधानसभा व पालिका निवडणुकांसाठी मातोश्रीचा वेगवेगळे रेट कार्ड असल्याचा खळबळ जनक आरोप योगेश कदम यांनी केलाय .नीलम ताईंनी सांगितलेलं तथ्य डावलता येणार नाही असंही ते म्हणालेत
https://www.youtube.com/watch?v=pncrqyunjyw
हेही वाचा:
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
अधिक पाहा..
Comments are closed.