योगराज सिंग यांचा BCCI वर पुन्हा खळबळजनक आरोप, म्हणाले, 7 भारतीय खेळाडूंचं करिअर गटारात घातलं!

योग्राज सिंग यांनी बीसीसीआयचा दावा केला: 2011 साली भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली होती. मात्र या ऐतिहासिक विजयाच्या नंतर भारतीय क्रिकेट संघाने दोन वर्षांत असे काही चढ-उतार पाहिले, जे अनेकांच्या स्वप्नांची राखरांगोळी करून गेले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकांमध्ये भारताला 0-4 अशी लाजिरवाणी हार पत्करावी लागली, आणि या पराभवांचं खापर सरळ त्या खेळाडूंवर फोडण्यात आलं ज्यांनी देशाला चॅम्पियन बनवलं होतं.

त्यावेळी निवडकर्त्यांनी एमएस धोनीला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णयही घेतला होता, ज्यामध्ये माजी भारतीय अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ हे निवड समितीच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होते. आता या सर्व बाबींबाबत माजी भारतीय स्टार क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग (Yuvraj Singh Father Yograj Singh) यांनी अमरनाथच्या निवड समितीवर गंभीर आरोप केले आहेत.

‘बीसीसीआयनं 7 भारतीय खेळाडूंचं करिअर गटारात घातलं…’

खरंतर, इनसाइडस्पोर्टशी बोलताना, युवराज सिंगचे वडील योगराज सिंग म्हणाले की, “तुम्ही (बीसीसीआय निवडकर्त्यांनी) विनाकारण या खेळाडूंचे  करिअर उद्ध्वस्त केले आहे. गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, मोहम्मद कैफ, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड सारखे खेळाडू यांचे नाव घेतले. 2011-12 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या परदेशी दौऱ्यांवर झालेल्या पराभवानंतर भारतीय खेळाडूंनी एक-एक करून निवृत्ती जाहीर करण्यास सुरुवात केली.

योगराज सिंग यांनी दावा केला की, 2011-2012 दरम्यान मोहिंदर अमरनाथ हा निवडकर्त्यांपैकी एक होता आणि त्याने एमएस धोनीला संघातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “2011 च्या वर्ल्ड कपनंतर तुम्ही संघ पूर्णपणे उद्ध्वस्त केला. 7 खेळाडूंचे करिअर गटारात फेकले गेले. म्हणूनच आम्ही संघर्ष करत होतो. जेव्हा एमएस धोनी कर्णधार होता तेव्हा आम्ही 5 मालिका गमावल्या. मोहिंदर अमरनाथ यांनी धोनीला सांगितले होते की त्याला काढल्या जाईल.”

इतिहास साक्षीदार आहे की 2011 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 18 महिन्यांच्या आत, एकतर जुने खेळाडू निवृत्त झाले किंवा त्यांना संघातून वगळण्यात आले. कसोटीतील खराब रेकॉर्ड दरम्यान एमएस धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

हे ही वाचा –

Ind Vs Pak : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक पुन्हा भिडणार! सामन्याची तारीख ठरली, जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

IND vs ENG Test Series 2025 : Star Sportsवर नाही, आता इथं पाहा भारत-इंग्लंड कसोटी! अचानक बदलला लाईव्ह टीव्हीचा चॅनल, जाणून घ्या A टू Z

आणखी वाचा

Comments are closed.