“देवासाठी, क्रिकेटपटूंना जिममध्ये पाठवणं बंद करा” 'या' माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य!
जिम वर्कआउटवर योग्राज सिंग: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंग यांचे वडील योगराज सिंग यांनी क्रिकेटपटूंनी जिममध्ये जाण्याबाबत अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. योगराज सिंग यांचं म्हणणं आहे की आजकाल खेळाडूंना वारंवार होणाऱ्या दुखापतीचं मुख्य कारण म्हणजे जिममध्ये जाऊन गरजेपेक्षा जास्त वजन उचलणे. (Yograj Singh on gym workouts)
योगराज सिंग म्हणाले, “भारताच्या प्रमुख खेळाडूंना दुखापती होण्यामागे मॉडर्न डे जिम हे एक मोठं कारण आहे. मी आश्चर्यचकित होतो जेव्हा मी पाहतो की क्रिकेटपटू जिमला जात आहेत. जिममध्ये जाणं तेव्हा योग्य आहे जेव्हा तुम्ही 35-36 वर्षांचे होता, नाहीतर तुमचे स्नायू घट्ट होतात. लोकांनी समजून घ्यावं की ते नेमकं काय करत आहेत. तुमचं शरीर सैल होत असेल तेव्हाच ते मजबूत करण्यासाठी जिम उपयुक्त आहे.” (Yograj Singh Statement)
पुढे बोलताना ते म्हणाले, “आजकाल तरुण वयातच जिम सुरू केलं जातं, आणि यामुळेच दुखापती वाढत आहेत. 30-40 वर्षांपूर्वी खेळाडूंना एवढ्या दुखापती होत नव्हत्या, कारण क्रिकेटमध्ये शरीर लवचिक आणि व्यायामपटूसारखं असावं लागतं. प्रत्येकाने आपल्या शरीरानुसारच वजन उचलावं.” (Fitness tips for cricketers)
यानंतर योगराज सिंग यांनी थेट अपील केलं, “देवासाठी, खेळाडूंना जिममध्ये पाठवणं बंद करा.”
शेवटी ते म्हणाले, “जसप्रीत बुमराह 4 वेळा दुखापतीमुळे बाहेर गेला आहे, कारण काय? कारण जिम. याच यादीत मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याचाही समावेश आहे. तुम्हाला बॉडीबिल्डर व्हायचं नाही, खेळाडू व्हायचं आहे. जुने खेळाडू बघा. विव रिचर्ड्स देखील 35 वर्षांचा होईपर्यंत कधीही जिममध्ये गेला नव्हता.” (Yograj Singh Statement On Indian Player’s)
Comments are closed.