रिटायरमेंटचं खरं कारण क्रिकेट नाही तर बायका…; युवराज सिंगच्या वडिलांच्या विधानाने खळबळ! रोहित
क्रिकेटपटूंच्या निवृत्तीबद्दल योगराज सिंग: योगराज सिंग (Yograj Singh) हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. मनात जे येईल ते स्पष्टपणे बोलण्याची त्याची सवय आहे. यावेळीही त्यांनी क्रिकेटपटूंविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. विशेषतः माजी क्रिकेटपटूंच्या निवृत्तीमागील कारणांवर भाष्य करत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. स्वतः क्रिकेट अकॅडमी चालवणारे योगराज कडक प्रशिक्षक म्हणूनही प्रसिद्ध आहेत, याचा उल्लेख यापूर्वी युवराज सिंग यांनीही केला आहे.
68 वर्षीय योगराज सिंग यांनी म्हटले की, अनेक क्रिकेटपटू त्यांच्या करिअरला अलविदा म्हणण्यामागे पत्नी आणि मुलं ही मोठी कारणं असतात. त्यांच्या मते, खेळाडूच्या क्षमतेवर वयाचा काहीही परिणाम होत नाही. जर एखाद्या खेळाडूमध्ये खेळण्याची जिद्द आणि आवड असेल, तर तो हवे तितके दिवस खेळू शकतो.
“आपली मुलं मोठी झाली आहेत…”
इनसाइडस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, भारतात 40 वर्षांनंतर लोक स्वतःला वृद्ध समजू लागतात. महिलाही 30 नंतर फिटनेसकडे दुर्लक्ष करतात आणि “आता मुलं मोठी झाली, आपण काय करणार?” असे म्हणतात. त्यांनी त्यांच्या जिममध्ये खास फिटनेस रूटीन सुरू केल्याचे सांगत, वयस्कर लोकांनाही तंदुरुस्त ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. “खेळाचा आणि वयाचा संबंध कसा जोडता येईल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
योगराज यांनी पुढे म्हटले की, घरातील महिला विशेषतः पत्नी खेळाडूंना निवृत्तीचा सल्ला देतात आणि कुटुंबाकडे लक्ष देण्यास सांगतात. त्यामुळे त्यांच्या मते, एखाद्या खेळाडूच्या उज्ज्वल भविष्यात महिलांनी अडथळा आणू नये. त्यांनी असेही म्हटले की, “फकीर आणि खेळाडू यांना धर्म किंवा वर्ग नसतो, ते देवाचे असतात. ते जिवंत असताना खूप काही करू शकतात.”
विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल वक्तव्य
विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या निवृत्तीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना योगराज म्हणाले की, वयाचा त्यांच्या करिअरशी काहीही संबंध नाही. “ते अजूनही तरुण आहेत. जर ते निवृत्तीचा विचार करत असतील, तर ते चुकीचे आहे. जगाला दाखवा की तुम्ही सर्वोत्तम आहात. जरी तुम्ही 50 वर्षांचे असाल आणि दुहेरी शतक करत असाल, तरी कोणीही तुम्हाला संघातून बाहेर काढणार नाही,” असे ते म्हणाले.
एमएस धोनीबद्दल मोठं विधान
योगराज यांनी पुढे म्हटले की, महान एमएस धोनी याने अजून 10 वर्षे IPL खेळायला हवे. आजही त्याच्यात ताकद दिसते. तो कमाल माणूस आहेत. लोक कोण असतात त्याला निवृत्तीचा सल्ला देणारे? क्रिकेटसाठी त्याने जे केले, त्याला माझा सलाम,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.