विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकन देण्यात आले आहे.

ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी 22 ते 27 जुलै या कालावधीत रंगणार आहे. 15 वर्षांखालील मुलांच्या गटात नाशिकच्या विश्वजित थविलला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. तर, याच मुलींच्या गटात पुण्याच्या शरयू रांजणे हिला अव्वल मानांकन मिळाले आहे. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात नागपूरच्या ऋत्व सजवान याला, तर मुलींच्या गटात नागपूरच्या शौर्या मडवीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.

खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे ः 15 वर्षांखालील मुले ः 1. विश्वजित थविल (नाशिक), 2. चिन्मय फणसे (पुणे), 3. आदित्य याउल (नागपूर), 4. मयंक राजपूत (ठाणे), 5. सिब्तैनराझा सोमजी (पुणे), 6. मयूरेश भुटकी.

15 वर्षांखालील मुली ः 1. शरयू रांजणे (पुणे), 2. सोयरा शेलार (पुणे), 3. कायरा रैना (पुणे), 4. ख्याती कत्रे (पुणे), 5. शर्वरी सुरवसे (पुणे).

17 वर्षांखालील मुले ः 1. ऋत्व सजवान (नागपूर), 2.यश ढेंबरे (ठाणे), 3. सचित त्रिपाठी (पुणे), 4.अवधूत कदम (पुणे), 5. हर्षित माहीमकर, 6. ओजस जोशी (पुणे), 7. अभिक शर्मा (पुणे), 8. हर्षित नेरकर (नाशिक).

17 वर्षांखालील मुलीः 1. शौर्या मडवी (नागपूर), 2. गाथा सूर्यवंशी, 3. धृती जोशी (पुणे), 4. प्रांजल शिंदे (पालघर), 5. केतकी थिटे, 6. अनुष्का इप्टे, 7. पूर्वा मुंडले (पुणे), 8. जुई जाधव (पुणे).
दुहेरी गट ः 15 वर्षांखालील मुले ः 1. सयाजी शेलार(पुणे)/उदयन देशमुख(संभाजीनगर), 2. मयूरेश भटकी/विश्वजित थविल(नाशिक), 3.बेनेट बिजू(नाशिक)/रियश चौधरी(पुणे), 4.मार्गशीरशा आव्हाड (नाशिक)/प्रणव सावंत (पालघर).

Comments are closed.