चंद्रकांतदादा म्हणाले, तिजोरीची चावी नाही, तिजोरीचा मालक आमच्याकडे

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू असून, महायुतीच्या सत्ताधाऱ्यांमध्येच मतांसाठी निधीवरून जुंपल्याचे जाहीर प्रचारात पाहायला मिळत आहे. ‘तुमच्या हातात मत द्यायचे आहे, तर निधी द्यायचे माझ्या हातात आहे’, असा दम उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मतदारांना दिला होता. यानंतर कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनीही याचा पुनरुच्चार केला. त्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक मुख्यमंत्री आमच्याकडे आहे, असे चंद्रकांतदादा म्हणाले. ‘संधीसाधू राजकारण जिह्यात फार काळ चालणार नाही’, असा टोलाही त्यांनी मुश्रीफ यांना लगावला.

Comments are closed.