ICC चा नियम बदलला असता, तर आज रंगला असता 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 9 मार्च रोजी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला ज्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा चार विकेट्स ने पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी वर भारताचे नाव कोरले.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करून भारतीय संघाला 252 धावांचं आव्हान दिलं होतं. भारतीय संघाने चार विकेट्स शिल्लक ठेवून हे आव्हान पूर्ण केलं. तुम्हाला माहिती आहे का, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना कालच्या ऐवजी आज होणार होता तर तुम्ही विश्वास ठेवू शकता? आयसीसीचा एक असाही नियम आहे, जर तो लागू करण्यात आला असता तर अंतिम सामना आज 10 मार्च रोजी खेळण्यात आला असता.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकानुसार अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार होता. पण भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला त्यामुळे हा सामना दुबईमध्ये खेळण्यात आला. नाहीतर हा सामना पाकिस्तानमध्ये खेळण्यात आला असता. जर 9 मार्च रोजी दुबई मध्ये पाऊस, किंवा हवामान खराब झालं असतं तर हा सामना पूर्ण होऊ शकला नसता. या कारणाने अशातच राखीव एक दिवस ठेवला जातो. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यासाठी 10 मार्च राखीव दिवस ठेवण्यात आला होता. त्यामुळेच जर 9 मार्च रोजी पाऊस आला असता तर भारत न्यूझीलंड अंतिम सामना 10 मार्च रोजी खेळण्यात आला असता.
आयसीसीच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकूण 9 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच आतापर्यंत आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये भारतीय संघ सर्वात जास्त चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ ठरला आहे. टीम इंडियाने तिसऱ्या वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने दोन वेळा हा किताब त्यांच्या नावावर केला आहे. श्रीलंका,न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांनी एक एक वेळा चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे.
टीम इंडिया बद्दल बोलायचे झाल्यास 2002 मध्ये त्यांनी श्रीलंका सोबत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर 2013 मध्ये भारत चॅम्पियन्स ठरले होते आणि आता 2025 मध्ये तिसऱ्या वेळेस भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफीवर त्यांचे नाव कोरले आहे. भारतीय संघ चॅम्पियन संघाचा चॅम्पियन्स ठरला आहे. भारतीय संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारे कर्णधार सौरव गांगुली, एम एस धोनी आणि रोहित शर्मा आहेत.
हेही वाचा
यजमान पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतीय संघ ठरला चॅम्पियन! जाणून घ्या अविस्मरणीय क्षण
इंग्लंडच्या खेळाडूने तोडला IPL नियम, 2 वर्षांची बंदी शक्य!
संघ हरणार असेल, तर माझ्या शतकांना काही अर्थ नाही! – रोहित शर्मा
Comments are closed.