You will get a court date but not for tests, comment of assembly speaker over poor condition of government hospitals in marathi
Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : एकवेळ न्यायालयाची तारीख मिळेल. पण शासकीय रुग्णालयात रुग्णांना सिटी स्कॅन, एमआरआयच्या चाचण्यासांठी तारखा मिळणार नाही, अशा उपहासात्मक शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शासकीय रुग्णालयातील दुरावस्थेवर बोट ठेवले. (you will get a court date but not for tests, comment of assembly speaker over poor condition of government hospitals)
बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसच्या साजिद पठाण यांनी अकोला जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टेस्ला मशिन खरेदीवर प्रश्न उपस्थित केला होता. यावर उपप्रश्न विचारताना विरोधी बाकांवरील सदस्यांनी रुग्णालयातील गैरव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी आपले निरीक्षण नोंदवताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातील सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयाचा दाखला देत तेथे एमआरआय तसेच सिटीस्कॅन चाचण्यांसाठी रुग्णांना मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. जे. जे. रुग्णालयातील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. यावर त्वरित उपायजोयना व्हाव्यात यासाठी सविस्तर निवदेन करण्याचे निर्देशही त्यांनी सरकारला दिले.
मुंबईतील कामा रुग्णालयात महिलांच्या प्रसुती, मूत्रविकार, कर्करोग, इत्यादी महिला रुग्णांशी संबंधित तसेच इतर सर्वसामान्य 90 ते 100 शस्त्रक्रिया तीन आठवड्यापासून प्रलंबित आहेत. तर जे. जे. रुग्णालयातील भूलतज्ज्ञ हे जीटी, सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन काम करीत असून सध्या जे. जे. रुग्णालयात भूलजतज्ज्ञांच्या 37 जागांपैकी 18 जागा रिक्त आहेत. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती अंशतः खरी असल्याचे मान्य केले. यावेळी सर्व सरकारी रुग्णालयांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यातच महापालिका रुग्णांचा देखील समावेश करण्यात यावा, अशी सूचना ठाकरे गटाच्या आमदारांकडून करण्यात आली.
हेही वाचा – Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात केवढे हे क्रौर्य, आपण कोणासाठी विकास करतोय, छगन भुजबळ यांचा उद्विग्न सवाल
Comments are closed.