भारताचा स्टीव्ह स्मिथ? तरुण फलंदाजाने केली हुबेहूब नक्कल; व्हायरल VIDEO नक्की पाहा

भारतातील एका युवा फलंदाजानं ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथची अचूक नक्कल केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्मिथच्या अनोख्या तंत्रामुळे आणि विचित्र फलंदाजीच्या शैलीमुळे त्याची नक्कल करणं निश्चितच आव्हानात्मक आहे, परंतु या तरुण खेळाडूनं स्मिथची हुबेहूब नक्कल केली.

या तरुण फलंदाजाचे पाच चेंडू खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चेंडू सोडत असतो किंवा त्याचा बचाव करत असतो. या फलंदाजानं हे सर्व काही स्मिथच्या शैलीत केलं. चेंडू खेळल्यानंतर त्याच्या हावभावांवरून असं दिसून येतं की तो स्मिथचं अगदी तंतोतंत अनुकरण करत आहे.

स्टीव्ह स्मिथ हा आधुनिक काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्यानं जगभरातील अनेक तरुणांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केलं आहे. स्मिथच्या शैलीची इतक्या चांगल्या प्रकारे नक्कल केल्याबद्दल अनेकांनी या तरुण फलंदाजाचं कौतुक केलंय. तुम्ही याचा व्हिडिओ येथे पाहू शकता.

स्टीव्ह स्मिथला आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार बनवण्यात आलंय. श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली, तर अष्टपैलू मिचेल मार्शला संघातून वगळण्यात आलं. आता स्मिथच्या नेतृत्वाखालील कांगारू संघ श्रीलंका दौऱ्यात यशस्वी होईल की नाही, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

स्टीव्ह स्मिथनं नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 101 धावा केल्या होत्या. याशिवाय त्यानं मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटीत 140 धावा केल्या होत्या. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्मिथ सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज होता. त्यानं पाच सामन्यांमध्ये 34.88 ची सरासरी आणि 54.99 च्या स्ट्राईक रेटनं 314 धावा केल्या. स्मिथ त्याच्या कसोटी कारकिर्दीत 10 हजार धावा पूर्ण करण्यापासून फक्त एक धाव दूर आहे.

हेही वाचा –

“गौतम गंभीरने एकट्याने आयपीएल जिंकवले नाही, पण सगळं श्रेय त्याला मिळालं”; माजी खेळाडू बरसला
अनुभवी फिरकीपटूचा विजय हजारे ट्रॉफीत जलवा! भारतीय संघात पुन्हा संधी मिळणार का?
सीएसकेच्या माजी खेळाडूचा मोठा पराक्रम! 6 चेंडूत ठोकले सलग 6 चौकार

Comments are closed.