लग्न नको रे बाबा …चीनी तरुण लग्नापासून पळताहेत दूर
![China (1)](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/China-1-696x447.jpg)
चीनमध्ये लग्नाचे प्रमाण घटले आहे. एकीकडे चीनमध्ये वृद्धांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे युवा तरुण विवाह करणे टाळत आहेत. भविष्यात हे संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशातच तरुणांनी योग्यवेळी लग्न करावे आणि अपत्यांना जन्म द्यावा, यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही.
2024 मध्ये चीनमध्ये 61 लाख विवाह झाले, तर 2023 मध्ये हा आकडा 77 लाख होता. 1886 मध्ये चीनमध्ये विवाहांची नोंदणी सुरू झाली होती. तेव्हापासूनचा हा सर्वात कमी आकडा आहे. 2013मध्ये सर्वाधिक विवाहांची नोंदणी झाली होती. 2013 च्या तुलनेत 2024 मधील आकडा निम्मा आहे.
मुलांचे पालनपोषण आणि शिक्षणावरचा वाढता खर्च चीनी लोकांना परवडत नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेची घट विस्कटली आहे, त्यामुळे तरुणांना रोजगार मिळण्यात अडचणी येताहेत. ज्यांच्याकडे नोकरी आहे, ते भविष्याबाबत असुरक्षित वाटत आहेत. चीनमध्ये विवाहाचे प्रमाण वाढावे, यासाठी सरकारला पावले उचलावी लागली आहेत.
सरकार टेन्शनमध्ये
चीन जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. चीनची लोकसंख्या 140 कोटी आहे. चिनी लोक वृद्ध होत आहेत. तिथला जन्मदर घटला आहे. 30 कोटी चीनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीत लग्न, प्रेम यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा- कॉलेजमध्ये लव्ह एज्युकेशन हा विषय ठेवण्यात आलाय. जेणेकरून लग्न, प्रेम, कुटुंब, प्रजनन याबद्दल लोकांमध्ये सकारात्मकता येईल.
Comments are closed.