अमेरिकेत कार समुद्रात कोसळून हिंदुस्थानी वंशाच्या तरुणीचा मृत्यू
अमेरिकेतील सांता क्रूझ येथील स्टीमर लेनजवळ कार कड्यावरून समुद्रात कोसळल्याने हिंदुस्थानी वंशाच्या तरुणीचा मृत्यू झाला. अॅली रेनी सिंग (19) असे मयत तरुणीचे नाव असून, ती युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये मानसशास्त्र विषयाची विद्यार्थिनी होती. अॅलीसोबत कारमध्ये एक व्यक्ती होता, तो बाहेर पडण्यास यशस्वी झाला. त्याला किरकोळ दुखापत झाली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पाणबुड्यांच्या मदतीने बचाव पथकांनी कारमध्ये अडकलेल्या अॅलीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अॅलीच्या मावशीने या घटनेला दुजोरा दिला आहे.
Comments are closed.