लातूरमध्ये अतिरिक्त व्याजासाठी तरुणावर तलवारीने हल्ला, धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद
लातूर बातम्या : लातूर शहरात पुन्हा एकदा तलवार आणि कोयत्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्याजासह पैसे परत करुन देखील अतिरिक्त व्याजाची मागणी पूर्ण न केल्याने चार जणांनी एका तरुणावर तलवार, काठी आणि दगडांनी हल्ला केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे. ही घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नाईक चौकात घडली आहे.
जखमी झालेल्या तरुणावर लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु
दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला गंभीर अवस्थेत लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणाऱ्या चौघांचा शोध पोलीस घेत असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही दिवसांत लातूरमध्ये कोयता आणि तलवार वापरून हल्ल्यांच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांमुळे पोलिसांची भूमिकाही प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Shocking incident: धक्कादायक… पतीनं भांडणावेळी कापलं पत्नीचे नाक, बोटांवरही ब्लेडने केला हल्ला, नाकाचा भाग प्राण्यांनी खाल्ला, नेमकं काय घडलं?
आणखी वाचा
Comments are closed.