ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तहेर कशी बनली? दानिश खरा मास्टरमाइंड; उचलला पाकिस्तान दौऱ्याच
YouTuber ज्योती मल्होत्रा: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणामधील हिसार येथे यूट्यूबर ज्योती मल्होत्रा (YouTuber Jyoti Malhotra) आणि नूंह येथे 22 वर्षीय अरमान या तरुणाला अटक करण्यात आली आहे. अरमानला शुक्रवारी रात्री, तर ज्योतीला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात हिसार न्यायालयाने ज्योतीला पाच दिवसांची, तर नूंह न्यायालयाने अरमानला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तहेर कशी बनली? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
हिसारमधील न्यू अग्रसेन कॉलनीतील रहिवासी ज्योति मल्होत्रा (Youtuber Jyoti Malhotra Kaun Hai) हिला हिसार पोलिसांच्या सीआयए (CIA) टीमने गुरुवारी रात्री उशिरा तिच्या घरी छापा टाकून ताब्यात घेतले होते. शुक्रवारी तिची चौकशी करण्यात आली आणि शनिवारी अटक करण्यात आली.
ज्योतीची दानिशसोबत अशी झाली होती भेट
2023 मध्ये ती पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान दुतावासात गेली होती. तिथेच तिची पाकिस्तान दुतावासातील एहसान-उर-रहीम उर्फ दानिश याच्यासोबत भेट झाली. ज्योतीने दानिशचा मोबाइल नंबर घेतला आणि त्यांच्यात बोलणे सुरू झाले. हळूहळू त्यांचे चांगले संबंध झाले. ज्योती पाकिस्तानला गेल्यानंतर दानिशच्या सांगण्यावरून अली अहवान नावाच्या व्यक्तीला भेटली. तिथे अलीनेच तिच्या राहण्याची, थांबण्याची आणि फिरण्याची व्यवस्था केली होती, अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे हाच तो दानिश आहे, ज्याला भारत सरकारने हेरगिरीप्रकरणी 13 मे रोजी देश सोडण्याचा आदेश दिला होता.
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तहेर कशी बनली?
ज्योती (Youtuber Jyoti Blogger) हिने पोलीस तपासात सांगितले की, इंटेलिजन्स आणि पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थांच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर तिची ओळख शाकिर आणि राणा शहबाज यांच्याशी करून देण्यात आली होती. मोबाईल नंबरची देवाण-घेवाण झाल्यानंतर ती पुन्हा भारतात परतली. ती इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात राहिली. कुटुंब, मित्रमंडळी किंवा इतर कुणालाही शंका येऊ नये म्हणून तिने शाकिरचा नंबर ‘जट रंधावा’ या नावाने सेव केला होता. शाकिरसह पाकिस्तानमधील अनेक अधिकारी आणि गुप्तचर संस्थांतील लोकांना ती इंटरनेट मीडिया अकाउंटच्या माध्यमातून माहिती देत होती. ज्योतीचा दानिशसोबत खूप चांगले संबंध झाले होते. याच महिन्यात तिने दिल्लीत दानिशला भेट दिली होती. ती याआधी तीन वेळेस पाकिस्तानमध्ये जाऊन आली आहे. ती चौथ्यांदा पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत होती. व्हिसासाठी तिने अर्ज देखील केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ज्योतीच्या पाकिस्तान दौर्याचा संपूर्ण खर्च दानिशने उचलला होता.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.