विद्यापीठाच्या जागेचा सर्रास आर्थिक फायद्यासाठी वापर, युवासेना राज्यपालांकडे तक्रार करणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील मोकळ्या जागेचा वापर सर्रासपणे आर्थिक फायद्यासाठी केला जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रीन मॅरेथॉनसाठी जवळपास 7 एकर जागा देण्यात आली, पण हीच जागा सैन्य भरती मैदानी मुलाखतीसाठी नाकारली होती. नंतर जिल्हाधिकाऱयांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर सैन्य भरतीसाठी जागा दिली होती. आर्थिक फायद्यासाठी होणाऱया जागेच्या वापराबाबत युवासेना राज्यपालांकडे तक्रार करणार आहे.

कलिना कॅम्पसची जागा सातत्याने टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी देण्यात येत आहे. वास्तविक ही जागा पाणथळ घोषित करण्यात आलेली आहे. असे असताना या ठिकाणी नियमित कचरा केला जातो. विद्यापीठाचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यापैकी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे होणाऱया अध्यासन केंद्राची इमारत याच जागेवर प्रस्तावित आहे. परंतु या जागेवर अद्याप एकही दगड रचलेला नाही. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्था त्यांच्या कार्यक्रमासाठी या जागेची मागणी करतात, परंतु त्यांना नकार देण्यात येतो. तथापि, मॅरेथॉनसाठी सातत्याने जागा उपलब्ध करुन दिली जाते. यात विद्यार्थ्यांचा सहभाग नसतो. विद्यापीठ राजकीय व्यक्तीच्या दबावातून हे करीत असल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ही जागा भाडय़ाने देण्याबाबत ठोस धोरण आखावे, अशी मागणी युवासेनेने केली आहे.

Comments are closed.