मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राची दुरवस्था, युवासेनेने कुलगुरूंची घेतली भेट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राची पडझड झाली असून काही वर्गांमधील छताचा भाग कोसळला आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही; मात्र हे गंभीर असून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या उपकेंद्राच्या दुरवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करत आज युवासेना सिनेट सदस्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेतली. सध्या उपकेंद्राची परिस्थिती काय आहे याची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी युवासेनेने केली आहे.

मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि निगडीत प्रशासकीय कामासाठी ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे विविध ठिकाणी उपपेंद्रे सुरू करण्यात आली; पण अनेक उपपेंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. त्यापैकी सिंधुदुर्ग उपकेंद्राची एक चित्रफीत समोर आली आहे. त्यामध्ये सदर उपकेंद्र व तेथील वर्गांची पडझड झालेली दिसत आहे. याचा जाब विचारण्यासाठी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, परमात्मा यादव आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन सद्यस्थितीची माहिती निवेदनाद्वारे विचारली आहे.

Comments are closed.