जैस्वाल, पंत IN…किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून
युवराज सिंगने वनडे वर्ल्ड कप 2027 साठी टीम इंडियाचा संघ निवडला: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2027 (ODI World Cup 2027) दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाने ऑक्टोबर 2027 मध्ये होणार आहे. याचपार्श्वभूमीवर भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंहने (Yuvraj Singh) 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संभाव्य 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलला (Shubhman Gill) कर्णधार म्हणून निवडले आहे . या संघात अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये शुभमन गिलसह रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे युवराज सिंहने ईशान किशनला विश्वषचक 2027 च्या संघातून वगळले आहे. (Team India Squad For ODI World Cup 2027)
सलामीसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल, तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, तर मधल्या फळीत श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे. गोलंदाजी विभागात रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच इंग्लंड दौऱ्यावर विकेटकीपर म्हणून खेळलेल्या ईशान किशनला युवराज सिंहने आपल्या संघात स्थान दिलेले नाही.
वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा संघ- (Yuvraj Singh Picks Team India Squad For ODI World Cup 2027)
- शुभमन गिल (कर्ंधर)
- रोहित शर्मा
- विराट कोहली
- केएल राहुल
- श्रेयस अय्यर
- हार्दिक पंड्या
- अक्षर पटेल
- रवींद्र जडेजा
- जसप्रीत बुमराह
- मोहम्मद सिराज
- अर्शदीप सिंग
- कुलदीप यादव
- हर्षित राणा
- यशस्वी जैस्वाल
- ऋषभ पंत
2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल- (ICC ODI World Cup 2027)
आयसीसीने 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल केला आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये ऑक्टोबर 2027 मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 14 संघ सहभागी होणार असून, ‘सुपर-7’ टप्पा जोडण्यात आला आहे. या नवीन रचनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन फॉरमॅटमध्ये 14 संघांना प्रत्येकी 7 च्या दोन गटात विभागले जाईल. साखळी फेरीत (Group Stage) प्रत्येक संघ 6 सामने खेळेल आणि त्यातून तळाचे दोन संघ बाहेर पडतील. दोन्ही गटांतील अव्वल 3 संघ पुढे ‘सुपर-7’ टप्प्यात प्रवेश करतील. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल सामने खेळवले जातील. ही स्पर्धा 4 ऑक्टोबर 2027 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
Comments are closed.