धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, जाणून घ्या धोका दिल्याच्या मुद्द्यावर नेमकं काय म्हणाला

भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yujvendra Chahal & Dhanashree verma) आणि धनश्री यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर धनश्रीचा एक व्हिडिओ अलीकडे खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये धनश्रीने चहलवर लग्न झाल्यानंतर फक्त 2 महिन्यांतच धोका दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सर्वांनाच या आरोपांवर चहल काय म्हणणार याची प्रतीक्षा होती. अखेर चहलने आपल्या विरोधात असलेल्या प्रत्येक आरोपावर पहिल्यांदाच मौन सोडलं.

चहलने सांगितले की, तो एक खेळाडू आहे आणि कधीही चीटिंग करत नाही. युजवेंद्र चहलने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना म्हटले, आपल्या लग्नाला 4.5 वर्षे झाली होती. जर फक्त दोन महिन्यातच धोका झाला असता, तर हे नातं टिकलं असतं का? मी आधीही सांगितले आहे की, मी भूतकाळातून बाहेर आलो आहे. तरीही काही लोक त्याच गोष्टीवर लक्ष ठेवून बसले आहेत. अद्यापही त्यांचे घर माझ्या नावावर चालते आहे. ते हे सर्व करत राहतील. मला याची अजिबात पर्वा नाही आणि मला काही फरकही पडत नाही.

त्यांनी पुढे सांगितले, मी हा अध्याय विसरलो आहे. लोक काहीही बोलतात आणि सोशल मीडियावर पसरते. 100 गोष्टी फिरतात, पण सत्य एकच आहे. जे लोक माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना सगळी गोष्ट नीट माहिती आहे. माझ्यासाठी हा अध्याय संपलेला आहे. मी यावर पुन्हा बोलू इच्छित नाही. मी माझ्या आयुष्यावर आणि खेळावर लक्ष केंद्रित करू इच्छितो.

युजवेंद्र चहल खूप काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. चहलने भारतासाठी शेवटचा सामना 2023 मध्ये वेस्टइंडिजविरुद्ध खेळला होता. या नंतर तो ना वनडे संघात परतला, ना टी-20 संघात. भारतासाठी चहलने आतापर्यंत एकूण 72 वनडे सामने खेळले आहेत आणि 121 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने एका डावात 5 विकेट घेण्याचा कारनामा दोन वेळा केला आहे. तर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये चहल 80 सामने खेळले आणि त्याने 96 विकेट्स घेतल्या. आयपीएल 2025 मध्ये चहल पंजाब किंग्ससाठी खेळला आणि त्याने 14 सामन्यांत एकूण 16 विकेट्स घेतल्या.

Comments are closed.