‘तिचं घर माझ्यामुळे चालतंय…’; धनश्रीच्या आरोपांवर अखेर युजवेंद्र चहलकडून एक घाव दोन तुकडे


धनाश्री वर्मावर युझवेंद्र चहल: कोरिओग्राफर असलेली धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सध्या ‘राईज अँड फॉल’ (Rise and Fall) या रिअॅलिटी शोमध्ये (Reality Show) सहभागी झालीय.  इथे ती इतर स्पर्धकांसोबत तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतेय. अशातच ती युजवेंद्र चहलसोबतच्या (Yuzvendra Chahal) नात्याबाबतही अनेक खुलासे करतेय. नुकताच तिनं दावा केलेला की, लग्नाच्या दुसऱ्या महिन्यांतच युजवेंद्रनं तिची फसवणूक केलेली. यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आलेलं. अशातच आता धनश्रीच्या सर्व आरोपांवर युजवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) मौन सोडलं आहे.

युजवेंद्र चहल नेमकं काय म्हणाला?

हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना युजवेंद्र चहलनं धनश्रीच्या आरोपांना उत्तर दिलंय. “मी एक खेळाडू आहे आणि मी चीट केलेलं नाही. जर मी दोन महिन्यांतच चीट केलं असतं, तर इतके वर्ष आमचं रिलेशनशिप चाललं असतं का? माझ्यासाठी धनश्री नावाचा चॅप्टर संपलाय… मी माझ्या आयुष्यात पुढे गेलोय आणि इतरांनीही जावं… जर दोन महिन्यांतच चीट केलं गेलं असतं, तर त्या रिलेशनशिपमध्ये कोणी राहिलं असतं का? मी माझ्या भूतकाळातून पुढे आलोय… पण, काही लोक अजूनही तिथेच अडकलेत… अजूनही त्याच गोष्टी धरून बसलेत… अजूनही त्यांचं घर माझ्या नावामुळेच चालतंय… त्यामुळे ते हे सुरूच ठेवतील. मला यानं काहीच फरक पडत नाही… आणि आता हे शेवटचं, मी माझ्या आयुष्यातल्या त्या चॅप्टरवर बोलतोय…”, असं युजवेंद्र चहल म्हणाला.

“जे माझ्यासाठी महत्त्वाचंय, त्यांना सत्य माहितीय…”

युजवेंद्र चहल एवढ्यावरच थांबला नाही, तो पुढे म्हणाला की, “सोशल मीडियावर शंभर गोष्टी सुरू आहेत, पण फक्त एकच सत्य आहे आणि जे खूपच महत्त्वाचं आहे, त्यांना ते माहीत आहे. हा चॅप्टर माझ्यासाठी संपलाय… मी त्याबद्दल पुन्हा बोलू इच्छित नाही… सध्या, मी फक्त माझ्या आयुष्यावर आणि माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करतोय… सध्या मी सिंगल आहे आणि लग्न करण्याचा कोणताही हेतू नाही…”

धनश्रीनं काय आरोप केलेले?

अलिकडेच, ‘राईज अँड फॉल’ या शोमध्ये कुब्रा सैतशी झालेल्या संभाषणादरम्यान, धनश्री म्हणाली की, “लग्नानंतर मला दुसऱ्या महिन्यांतच माहीत होतं की, युजवेंद्रसोबतचं माझं नातं टिकणार नाही… मला लग्नानंतर दुसऱ्या महिन्यातच धोका मिळालेला…” तर, त्याच शोमध्ये अर्जुन बिजलानीसोबत बोलताना धनश्री म्हणालेली की, युजवेंद्र चुकीचा असतानाही तिनं त्याला अनेकदा पाठिंबा दिलाय, कारण तिला त्याच्यासोबतचं नातं जपायचं होतं….”

दरम्यान, 2020 मध्ये धनश्री आणि युजवेंद्र दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाला चार वर्षे झाली. धनश्रीनं सांगितलं  की, त्यांचं लग्न चार वर्षच टिकलं, त्यापूर्वी त्यांनी एकमेकांना 6-7 महिने डेट केलेलं. धनश्री आणि युजवेंद्र यांची प्रेमकहाणी तेव्हा सुरू झाली, जेव्हा युझीनं डान्स शिकण्यासाठी कोरिओग्राफर असलेल्या धनश्रीला कॉन्टॅक्ट केलं. आधी त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आणखी वाचा

Comments are closed.