‘कुणाचा नवरा चोरणंही चिटिंगच…’ युझवेंद्र चहलची रुमर्ड गर्लफ्रेंड आरजे महावश ट्रोल
आरजे महवशने व्हिडिओवर ट्रोल केले: टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) रुमर्ड गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री आरजे महवशनं (RJ Mahvash ) आपल्या सोशल मिडिया (Social Account) अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमुळे ती जोरदार ट्रोल होत आहे. आरजे महावशनं रिलेशनशिपमधल्या चिटिंगवर एक व्हिडीओ पोस्ट केला. दरम्यान, सोशल मिडिया युजर्सनी तिच्या व्हिडीओवर महावशला ट्रोल केलं आहे. युजर्स अभिनेत्रीवर धनश्रीपासून चहलला वेगळं केल्याचा आरोप करत आहेत आणि म्हणत आहेत की, ही देखील फसवणूक आहे.
महवशनं इंस्टाग्रामवर फसवणूकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते की, “चिटिंग म्हणजे काय? एखाद्याला सीक्रेट मेसेज पाठवणं, एखाद्याचे मेसेज डिलिट करणं, तुमच्या एक्ससोबत लपून-छपून बोलणं, जिममध्ये शर्टलेस मुलांना फायर इमोजी पाठवणं, सेमी न्यूड कन्टेंट बनवणाऱ्या मुलींना फॉलो करणं, ही फसवणूक आहे.”
“कुणाचा नवरा चोरणं, ही देखील चिटिंग…?”
आरजे महावशच्या या व्हिडीओवर युजर्स तिला खूप ट्रोल करत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, “एखाद्याचा नवरा चोरणं, चिटिंग?” यावर आरजे महावशनं रिप्लायसुद्धा दिला आहे. तिनं लिहिलंय की, “मी चोरला नाही, त्यामुळे मला माहीत नाही… पण हो, कुणाचा नवरा चोरणं चिटिंग आहे…” दुसऱ्या एका युजरनं कमेंट केलीय की, “…आणि दुसऱ्याचा नवरा चोरणंही चिटिंग आहे.” तर, आणखी एका युजरनं लिहिलंय की, “युझी भाईला चोरलंस, चिटिंग…” याव्यतिरिक्त आणखी एका युजरनं लिहिलंय की, “फेम मिळवण्यासाठी कुणाचंही घर तोडणं, हेसुद्धा चिटिंग आहे…”
प्रेमात मिळालेल्या धोक्याबाबत पोस्ट
अभिनेत्रीनं व्हिडीओसोबत कॅप्शनही लिहिलंय की, “अशा व्यक्ती स्वतःच स्वतःचं कर्म असतात… भाई सोड त्याला, स्वतःच डिप्रेस्ड मरतील अशी लोकं… ठीक आहे… मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, जर तुम्ही कुणी अशा व्यक्ती असाल, ज्यांना आयुष्यात खूप मोठा धोका मिळाला आहे, तर अशा व्यक्तीसाठी दुःखी व्हा, ज्याला हे कळलं असेल की, प्रेम दररोज होत नाही. हे रेयर आहे आणि हे या जगात असण्याचा पॉईंट आहे की, प्रेम पसरवा…”
“कुणालाही तुमचा दोनदा अपमान करू देऊ नका…”
आरजे महावशनं पुढे लिहिलंय की, “ते शेवटी पुढच्या व्यक्तीला फसवतील आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीला आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीला. जेव्हा देव तुम्हाला त्यांचे लाल झेंडे दाखवेल तेव्हा ते पाहा… क्षमा म्हणजे काय? कधीही क्षमा करू नका, नाहीतर तुम्ही पुन्हा चिरडले जाल. मी माझ्या शेवटच्या नात्यात 3 वेळा क्षमा करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणालाही तुमचा दोनदा अपमान करू देऊ नका… तुम्हाला त्यांच्यापेक्षा बरेच चांगले लोक सापडतील. योग्य व्यक्तीसोबत आयुष्य खूप लहान आहे आणि चुकीच्या व्यक्तीसोबत खूप मोठे आहे.”
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.