झेडपी – पंचायत समिती निवडणूक; 2200 जागांसाठी 20 हजार उमेदवार रिंगणात

राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका येत्या 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. या निवडणुकांसाठी सुमारे 20 हजार उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 7695 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी 13 हजार 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाकडून आज ही माहिती देण्यात आली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक 73 जागा पुणे जिल्हा परिषदेमध्ये आहेत. त्यासाठी 853 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. धाराशीवमध्ये जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी 967 इतक्या मोठय़ा संख्येने अर्ज आले आहेत. अशीच स्थिती छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा जिल्हा परिषदांमध्येही आहे. तिथे जागांपेक्षा अनेक पटीने अर्ज आले आहेत.

Comments are closed.