ZIMvsAUS: सचिनचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ब्रेंडन टेलर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ‘या’ बाबतीत गेला पुढे

खेळात केले गेलेले विक्रम हे कधीना कधी कोणीतरी मोडणारच. दिग्गज सचिन तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम उद्ध्वस्त झाला आहे. ही कामगिरी झिम्बाब्वेच्या विकेटकीपर-फलंदाज ब्रेंडन टेलरने केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरताच इतिहास रचला आहे.

सध्या ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात असून पहिला सामना आज (मंगळवार, 15 सप्टेंबर) हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात टेलर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक काळ खेळणारा खेळाडू ठरला आहे. हा विक्रम करताना त्याने भारताच्या माजी खेळाडूला मागे टाकले आहे.

झिम्बाब्वेच्या महान खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक काळ खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने 22 वर्ष आणि 148 दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळत सचिनच्या 22 वर्ष 91 दिवसाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळण्याच्या विक्रमाला मागे टाकले आहे. त्याने 2004 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक काळ खेळण्याचा विक्रम या यादीत श्रीलंकेचा सनथ जयसूर्या तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 21 वर्ष आणि 184 दिवस (1989-2011), पाकिस्तानचा जावेद मियांदाद चौथ्या आणि झिम्बाब्वेचा शॉन विल्यम्स पाचव्या स्थानावर आहे.

एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात प्रदीर्घ कारकीर्द (पुरुष)
22 वर्षे 148 दिवस – ब्रेंडन टेलर (झिम्बाब्वे, 2004 –)*
22 वर्षे 91 दिवस – सचिन तेंडुलकर (भारत, 1989-2012)
21 वर्षे 184 दिवस – सनथ जयसूर्या (श्रीलंका, 1989-2011)
20 वर्षे 272 दिवस – जावेद मियांदाद (पाकिस्तान, 1975-1996)
20 वर्षे 187 दिवस – शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे, 2005-2025)

टेलर झिम्बाब्वेच्या इतिहासात सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारा खेळाडू आहे. त्याने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. नंतर त्याच्यावर 2022 मध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने आयसीसीने साडे तीन वर्षांची बंदी घातली होती. शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्याने निवृत्ती मागे घेतली. (ZIM vs AUS 1st ODI Brendan Taylor breaks Sachin Tendulkar’s record for the longest career in men’s ODIs)

Comments are closed.