अनंत सिंग यांच्या पत्नीला नोटीस जारी – TMarathiNews
बंगला रिकामा करण्यासाठी सरकारकडून कारवाई
वृत्तसंस्था/ पाटणा
जेडीयूमध्ये हकालपट्टी करण्यात आलेले नेते अनंत सिंग यांच्या पत्नी नीलम देवी यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. बांधकाम विभागाने सोमवार, 26 ऑक्टोबर रोजी त्यांना नोटीस जारी केली आहे. सध्या ताब्यात असलेले सरकारी निवासस्थान त्यांना 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत रिकामे करण्याची सूचना करण्यात आली आहे. नीलम देवी ह्या उपमंत्री पदाच्या दर्जावर असल्याने त्यांना मॉल रोडवरील शासकीय निवासस्थान देण्यात आले होते. अलिकडेच जेडीयूच्या शिफारशीनुसार नीलम देवी यांच्यावर पक्षांतर्गत हकालपट्टीची कारवाई केल्यानंतर आता त्यांना 20-कलमी समितीच्या सदस्यपदावरूनही हटवण्यात आले आहे. सोमवारी ही कारवाई करताच काही तासांतच निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस जारी करण्यात आली. नीलम देवी यांना पाटणा येथील मॉल रोडवर शासकीय निवासस्थान (घर क्रमांक 1) देण्यात आले होते.
Comments are closed.