आंजणारी घाटात ट्रेलरचा अपघात, केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाला वाचवण्यात पोलिसांना यश
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी घाटात आज सकाळी रत्नागिरीकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रेलर रस्त्याच्या शेजारील कठड्यावर जाऊन आदळला.ट्रेलरचा पुढील भागाचा चक्काचूर होऊन चालक आत अडकून पडला होता.लांजा पोलिसांनी जेसीबी, अग्निशमन दल आणि अन्य यंत्रणांची मदत घेत ट्रेलरची केबिन उघडून चालकाला सुखरूप बाहेर काढले.
आंजणारी घाटातील अपघातानंतर ट्रेलर ( क्र.एमएच- ४६ डिसी २७६३) चा पुढील भागाचा चक्काचूर झाला.ट्रेलरच्या केबीनमध्ये चालक राजकुमार रामकिशोर साहू वय २६ रा.मध्यप्रदेश) हा अडकून पडला होता.अपघाताची घटना डायल ११२ वर समजताच लांजा पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मैनदाड आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जेसीबी, अग्निशमन दल आणि अन्य यंत्रणांची मदत घेत ट्रेलरची केबिन उघडून चालकाला सुखरूप बाहेर काढले.
Comments are closed.