एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्…गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्

नागपूर: नागपुरातून चक्क दीड कोटी रुपयांची एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक बस चोरीला (Nagpur Crime News) गेल्याची एक अजब आणि तितकीच धक्कादायक (Nagpur Crime News) घटना समोर आली आहे. नागपूरच्या बसस्थानकातून चोरी झालेली ही ‘शिवाई’ बस अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी चोरट्यासह (Nagpur Crime News) पकडली केली आहे. अटक करण्यात आलेल्या या आंतरराज्यीय चोरट्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याने दिलेली माहिती ऐकून स्वतः पोलीसही चक्रावून गेले आहेत.(Nagpur Crime News)

Nagpur Crime News :  चार्जिंग स्टेशनवरून थेट बस पळवली!

१ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास नागपूरमधील इमामवाडा बसस्थानकातील चार्जिंग स्टेशनवर ‘एमएच ४९/ बी. झेड. ८२५८’ क्रमांकाची ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस उभी होती. यावेळी चोराने सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देत तब्बल १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची ही बस तिथून पळवून नेली. एसटी महामंडळाची बस चोरीला गेल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. दरम्यान, अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नंदा मार्केटजवळ एक संशयास्पद बस उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच ही बस चोरणारा तरुण राजापेठ येथील गद्रे चौकात थांबल्याचे समजताच, राजापेठ पोलिसांच्या डीबी पथकाने तातडीने सापळा रचून बससह चोरट्याला ताब्यात घेतले.

Nagpur Crime News : चौकशीत धक्कादायक खुलासा; आतापर्यंत २० बसेसची चोरी!

पोलिसांनी पकडलेल्या या आरोपीचे नाव विष्णू गणपती नीलावर (वय २३, रा. हईत नगर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) असे आहे. त्याने इमामवाडा बसस्थानकातून ही बस चोरल्याची कबुली दिली. मात्र, पुढील तपासात त्याने सांगितले की, त्याने आतापर्यंत तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातून तब्बल २० बसेस चोरल्या आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्रशहरातील नांदेड बसस्थानकावरूनही त्याने यापूर्वी एक बस पळवली होती. या आरोपीविरुद्ध वजिराबाद, सीसीएस पोलीस स्टेशन तिरूमला आणि इतर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत.

Nagpur Crime News : मध्यरात्री ३:३० वाजताच्या सुमारास पळवली बस

इमामवाडा डेपोतून गुरुवारी मध्यरात्री ३:३० वाजताच्या सुमारास २०हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या तेलंगणातील कुख्यात चोरट्याने एसटी महामंडळाची ‘शिवाई’ ई-बस चोरून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, बसची चार्जिंग संपली. हायटेक ट्रॅकिंग सिस्टीम आणि नागपूर-अमरावती पोलिसांच्या सतर्कतेमुळे अमरावतीच्या राजापेठ येथे आरोपीला चोरीच्या बससह बेड्या ठोकण्यात आल्या. विष्णू गणपती निलावार (वय २२, रा. हयात नाका, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल आरोपीचे नाव आहे. ई-बस चोरी केल्यानंतर त्या घेऊन फिरणे आणि बसची चार्जिंग संपल्यानंतर तिचे महागडे टायर व बॅटरी काढून विकण्याची या चोराला सवय आहे, असे पोलिस तपासात पुढे आले आहे.

एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. या सिस्टीममधील चीपच्या माध्यमातून बस नेमकी कोठे आहे, याची अचूक माहिती रिअल-टाइमसह उपलब्ध होते. बस गायब झाल्याचे समजताच नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी या ट्रॅकिंग प्रणालीचा वापर केला आणि बस ताब्यात घेण्यात आली.

Nagpur Crime News : इलेक्ट्रॉनिक चीपमुळे आरोपीचे सापडले लोकेशन

तर मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील इमामवाडा डेपोची ई-बस (एम. एच. ४९, बी. झेड-८२५८) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास बाहेर काढून आरोपी सुसाट वेगाने अमरावतीकडे पळाला. सकाळी ९ वाजेपर्यंत बस आगारात परत न आल्यामुळे सुरक्षारक्षक सुरेंद्र मिश्रा यांनी आगार व्यवस्थापक इमरान पटेल यांना मोबाइलवर माहिती दिली. बसमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप असल्याने अधिकाऱ्यांनी इंटरनेटवर तिचे लोकेशन तपासले असता ती अमरावतीजवळ असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर कंट्रोलने अमरावती पोलिसांना अलर्ट केले आणि राजापेठ पोलिसांनी आरोपीला बससह अटक केली.

हेदेखील वाचा

Comments are closed.