वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यातही बेंचवरच असणार?इंडियाच्या कोचचं ‘ते’ रोखठोक वक्तव्य चर्चेत
लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. पहिला सामना पावसामुळं रद्द करावा लागला. तर, आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा दोन्ही सामन्यात पराभव झाला आहे. यामुळं वैभव सूर्यवंशीला कधी संधी मिळणार याकडे सर्वांच लक्ष आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात 4 जुलै रोजी दुसरा टी 20 सामना होणार आहे. या सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनकडे लक्ष लागलं आहे. वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्याची मागणी होत आहे. यावर गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल, असं स्पष्ट केलं.
टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी म्हटलं की टॉप ऑर्डरच्या कोणत्याही खेळाडूला वगळलं जाणार नाही. म्हणजेच संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन यांना वगळलं जाणार नाही.जे खेळाडू गेल्या अनेक महिन्यांपासून टीमसाठी चांगली कामगिरी करत आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे.
मोर्ने मॉर्केल म्हणाले की संजू सॅमसन टी 20 वर्ल्ड कपचा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिला आहे. त्याचा आयपीएल हंगाम देखील चांगला राहिला आहे. प्रशिक्षक स्टाफच्या दृष्टीनं पाहिल्यास खेळाडूंवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. एका युवा खेळाडूला संधीची वाट पाहावी लागतेय, मात्र आम्हाला टॉप ऑर्डरच नाही तर पूर्ण संघाचा विचार करावा लागतो, असं मोर्ने मॉर्केलनं म्हटलं.
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीनं मॉर्केल प्रभावित
मॉर्ने मॉर्केल म्हणाले की त्यांनी नेटसमध्ये वैभव सूर्यवंशीचं प्रॅक्टिस घेतलं आहे, त्यानंतर ते वैभवची तयारी पाहून प्रभावित झाले. वैभव सूर्यवंशीनं इतर खेळाडूंसोबत चांगला समन्वय निर्माण केला आहे. जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो चांगली कामगिरी करेल, असंही मॉर्केल म्हणाला.
दरम्यान, भारत इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेतील एक सामना पावसामुळं रद्द झाला आहे. आता उर्वरित चार सामने खेळवले जाणार आहेत. दुसरा सामना मँचेस्टरला उद्या होणार आहे.
Comments are closed.