किरकोळ महागाई दर 3.48%
एप्रिलमध्ये वाढली महागाई : सर्वसामान्यांच्या खिशाला पोहाचतेय झळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून 3.48 टक्क्यांवर पोहोचल आहे. तर मार्च महिन्यात हा महागाई दर 3.40 टक्के राहिला होता. एप्रिल महिन्यासाठीचा महागाई दराचा आकडा मंगळवारी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून जारी करण्यात आला आहे. किरकोळ महागाई दर आता रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या 4 टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत पोहोचला आहे. या महागाईवाढीचा प्रभाव आता सर्वसामान्यांच्या घरातील खर्चावरही दिसून येत आहे. अमेरिका आणि इराणदरम्यान तणाव वाढलेला असताना महागाईत ही वाढ झाली आहे. पश्चिम आशियातील तणाव दीर्घकाळ राहिल्यास देशातील महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
महागाई दर वाढण्याचे सर्वात मोठे कारण अन्नधान्याच्या किमती वाढणे आहे. अन्नधान्य महागाई दर एप्रिल महिन्यात वाढून 4.20 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा आकडा 3.87 टक्के राहिला होता. तर शहरी महागाई दर 3.11 टक्क्यांवरुन वाढत 3.16 टक्क्यांवर गेला आहे. ग्रामीण महागाई दर 3.63 टक्क्यांवरून वाढत 3.74 टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्रामीण भागातील अन्नधान्य महागाई दर 4.26 टक्के इतकी नोंदविली गेली आहे. जी शहरी भागातील 4.10 टक्क्यांच्या तुलनेत किंचित अधिक होती.
प्रमुख अन्नपदार्थांमध्ये बटाट्यांच्या किमती वार्षिक आधारावर 23.69 टक्क्यांनी कमी झाल्या,तर कांद्याच्या किमती 17.67 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर मौल्यवान धातू आणि निवडक भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. टोमॅटोच्या किमती 35.28 टक्क्यांनी वाढल्या आहेत. चांदीच्या दागिन्यांची महागाई अत्यंत उच्च पातळीवर म्हणजेच 144.34 टक्क्यांवर राहिली. तर सोने, हिरे आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांच्या किमतीत वार्षिक आधारावर 40.72 टक्क्यांची वाढ झाली आहे.
श्रेणीनिहाय विचार केल्यास एकत्रित विभागामध्ये ‘अन्न आणि पेये’ या श्रेणीतील महागाई दर 4.01 टक्के नोंदविला गेला. तर वाहतूक क्षेत्रातील महागाई जवळपास स्थिर राहिली. वैयक्तिक निगा आणि इतर विविध वस्तू आणि सेवांमधील महागाई दर 17.66 टक्के या उच्चपातळीवर कायम राहिला. दागिन्यांसारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तूंच किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे प्रामुख्याने ही स्थिती निर्माण झाली.
तेलंगणात सर्वाधिक
राज्यांच्या बाबतीत एप्रिलमध्ये तेलंगणात एकत्रित महागाईचा दर सर्वाधिक 5.81 टक्के नोंदवला गेला. त्यानंतर पु•gचेरीत 4.41 टक्के आणि आंध्रप्रदेशात 4.20 टक्के महागाई नेंदविली गेली. उत्तरप्रदेशात 3.59 टक्के, दिल्लीत 1.69 टक्के महागाई दराची नेंद झाली.
नव्या पद्धतीने मापन
महागाईच्या नव्या फॉर्म्यूल्याच्या अंतर्गत (2024 आधार वर्ष) जारी ही तिसरी आकडेवारी आहे. केंद्र सरकारने महागाई मोजण्याच्या बास्केटमध्येही बदल केला आहे. अन्नधान्याच्या गोष्टींचे वेटेज 45.9 टक्क्यांवरून घटवत 36.75 टक्के करण्यात आले आहे. तर हाउसिंग आणि वीज-गॅसचे वेटेज वाढविण्यात आले आहे.
काय हटविले : व्हीसीआर आणि ऑडियो कॅसेटसारखी जुनी सामग्री बास्केटमधून हटविण्यात आली.
काय जोडले : ओटीटी सब्सक्रिप्शन, डिजिटल स्टोरेज यासारखे खर्च सामील करण्यात आले आहेत.
Comments are closed.