'तुम्ही मला संघातून वगळा'! रोहित शर्माचा BCCI निवडकर्त्यांना प्रभावी संदेश, असे भारताच्या दिग्गजाचे मत
इंग्लंड दौऱ्यात ऐतिहासिक शतकी खेळी केल्यानंतर भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मबद्दलच्या चर्चा काही प्रमाणात थांबल्या आहेत. अनुभवी सलामीवीराने मागील महिन्यात लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 138 धावांची खेळी केली आणि एकप्रकारे टीकाकरांची तोंडे बंद केली.
लॉर्ड्स वनडेआधी रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांना उधान आले होते. तसेच वरिष्ठ संघनिवड समितीने त्याला कळवले होते की, तो 2027 च्या वनडे विश्वचषकासाठी भारताच्या योजनेचा भाग नाही. यामागचा निवड समितीचा हेतू असा की, त्यांना यशस्वी जायस्वालसह इतर युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत, तीन सामन्यांची वनडे मालिका जुलै महिन्यात पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहितने संथ खेळी केली आणि त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर त्याने मालिका निर्णायक सामन्यात, जो लॉर्ड्सवर खेळला गेला, त्यामध्ये शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीवर भारताच्या दिग्गजाने आपले मत व्यक्त केले आहे.
“रोहित शर्मा एकप्रकारे असे म्हणत आहे की, जर मी चांगली कामगिरी करत नसेन, तर निर्णय तुम्ही स्वत:च घ्या. मला संघातून वगळा”, असे कैफने एका चर्चेदरम्यान म्हटले आहे.
“रोहितने निवृत्ती जाहीर न करणे, तो दाखवत असलेल्या उत्साह, ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत आहे आणि लॉर्ड्सवरील शतक या सर्वांवरून असे दिसते की त्याचे संपूर्ण लक्ष खेळावर केंद्रित आहे. त्यानंतर निवड समितीला जे काही करायचे आहे, तो त्यांचा निर्णय आहे. कदाचित आधी त्याला अंतर्गत पातळीवर समजावण्याचा प्रयत्न झाला असेल. सध्याची समस्या अशी की, कोणाची भूमिका काय आहे हे समजणे कठीण आहे. खूप गोंधळ आहे”, असे कैफने त्याच्या यूट्युब चॅनेलवर म्हटले आहे.
“संघ व्यवस्थापनाने रोहितच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. जर त्याची एखादी मालिका निराशाजनक जात असेल तर त्यांनी त्याला आत्मविश्वास दिला पाहिजे. त्याला स्वांतत्र्य देण्यासोबत त्यांनी त्याला पाठिंबा असल्याचे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. मला वाटते रोहितने आता स्वत:हून माघार न घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असेही कैफने पुढे म्हटले आहे.
या जबरदस्त शतकी खेळीमुळे रोहितचे नाव लॉर्ड्सच्या वनडे ऑनर्स बोर्डवर झळकले. लॉर्ड्सच्या वनडे ऑनर्स बोर्डवर झळकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तो सामना भारताने 27 धावांनी गमावला, मात्र सर्वाधिक चर्चा रोहितच्या शतकाचीच झाली
Comments are closed.