‘अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदीही गुंगा गुड्डा झालेत’

Sanjay Raut on Amit Shah: अमित शाह जे सध्या लपून बसले आहेत ती भूमिका त्यांनी स्वीकारली आहे का? त्यांना गुंगा गुड्डा म्हणाव लागेल ना? मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली. जोपर्यंत गृहमंत्री संसदेत येऊन जंतरमंतरवर लाठी चार्ज, टिअर गॅस, पॅलेट गन्स चालवण्याचे आदेश कोणी दिले हे सांगत नाही, तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला. दरम्यान, आजही (5 ऑगस्ट) संसदेत इंडिया आघाडीकडून अमित शाह संसदेत येत नसल्याने आंदोलन करण्यात आले.

सुनेत्रा पवार वादावर काय म्हणाले?

दरम्यान, सुनेत्रा पवारांना उद्देशून झालेल्या टिप्पणीनंतर राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सुनेत्रा वहिनीना जर कोणी गुंगी गुडिया म्हटलं असेल. त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटल असतं आपण राजकारणामध्ये आहोत आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि भविष्यात या चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती पण इंदिराजी यांनी सिद्ध करून दाखवलं की मी स्वतंत्र बाण्याची एक स्त्री आहे मी गुंगी गुडिया नाही. त्यांनी पुढे सांगितले की, सुनेत्रा पवार व्यक्ती म्हणून नसून राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत बारामतीत त्यांच्या घरी जाऊन कोणी प्रश्न विचारलेला नाही. त्या राज्याच्या घटनात्मक पदावर आहे त्यांनी शपथ घेतलेली आहे. असे काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ले वगैरे करण्यापेक्षा त्यांच्या लोकांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावीत, असा टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे

नवी मुंबई विमानतळ नामकरणावर राऊत म्हणाले की, दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावं म्हणून जंतर मंतरवर आंदोलन होत आहे. त्यापेक्षा मी माझ्या या सर्व सहकाऱ्यांना सांगणार आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांनी हा प्रस्ताव तयार करून दिल्लीला पाठवला. त्यामुळे ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचे ते म्हणाले.

Comments are closed.