पंच्याऐशी हजारची गोळी पस्तीसमध्ये – TMarathiNews
औषधे आणि आरोग्य सेवा बऱ्याच महाग झाल्या आहेत, ही सर्वसामान्य भावना आहे. तरीही आज भारतासारख्या विकसनशील देशात अमेरिकेसारख्या विकसीत आणि ‘हेल्थ कॉन्शस’ देशापेक्षा औषधे आणि आरोग्य सेवा बरीच स्वस्त मिळते, हे दिसून आले आहे. तसेच ही औषधे आणि सेवा यांच्या गुणवत्तेतही फारसे अंतर असत नाही. अमेरिकेत जी औषधे हजारो रुपयांना घ्यावी लागतात. ती भारतात कितीतरी कमी किमतीला मिळतात. तसेच शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय खर्चही बराच कमी येतो, हे सिद्ध झाले आहे. अमेरिकेतील लोकांनाही आता हे समजून आले असून ते आपल्या देशात या बाबी इतक्या महाग का, असा प्रश्न करु लागले आहेत. सध्या एक बाब अशी समोर आली आहे, की अमेरिकेत ज्या औषधच्या गोळीला 85 हजार रुपये मोजावे लागतात. तीच गोळी भारतात अवघ्या 35 रुपयांना मिळते. सोशल मिडीयावरुन सध्या याची बरीच चर्चा होताना दिसते.
औषधाच्या किमतीतील हे अंतर रक्तक्षयाच्या (ब्लड कॅन्सर) संदर्भात समोर आले आहे. अमेरिकेत दुर्मिळ प्रकारच्या रक्तक्षयावर दिल्या जाणाऱ्या गोळीची किंमत तब्बल 85 हजार रुपये आहे. तर भारतात याच गोळीचा ‘जेनेरीक’ पर्याय केवळ 35 रुपये ते 300 रुपयांना उपलब्ध आहे, असे एक अमेरिकन महिलाच स्पष्ट करतानाचा व्हिडीओ सध्या वेगाने प्रसारीत होत आहे. काही लोकांनी या व्हिडीओतील या कथनाची स्वतंत्ररित्या पडताळणीही केली. तेव्हा हे कथन खरे असल्याचे दिसून आले. या अमेरिकन महिलेचे नाव लीज असे आहे. औषधे सर्वात स्वस्त मिळणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रस्थानी आहे, असा माझा अनुभव आहे, असे लीज या व्हिडीओत स्पष्ट करताना दिसून येतात. त्यामुळे आपल्या देशात औषधे इतकी महाग का, हा प्रश्न आता अनेक अमेरिकन नागरीकांना पडू लागला आहे.
Comments are closed.