राऊतांनी अडीच वर्षात एक दिवस मंत्रालयात गेलेला मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा, दानवेंचा टोला

Raosaheb Danve on Sanjay Raut : संजय राऊत यांनी अडीच वर्षाच्या काळात मंत्रालयात गेलेला एक दिवसाचा मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा आणि त्याचा डायरेक्टर शरद पवारांना करावं, असा खोचक टोला भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी लगावला. यांची लोकप्रियता सोडा यांच्यासोबत राहणं आणि फिरणं म्हणजे लोक अपमान समजायला लागलेत अशी टीका रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंवर केली आहे. सुनेत्रा पवार यांचं अशा प्रकारचं वर्णन करणं ही काँग्रेसची पहिल्यापासून संस्कृती आहे, ते कधीच कुणाला चांगलं म्हणत नाही असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

देशामध्ये पेपर फुटीचे प्रकरण नको व्हायला हवं होतं

संसदेत विरोधक आक्रमक झाले आहेत, याबाबत देखील रावसाहेब दानवे यांना विचारण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, लोकसभेचं अधिवेशन हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेच्या समस्या मांडण्यासाठी त्याचबरोबर देशाच्या कारभार पाहण्यासाठी असतं. देशामध्ये पेपर फुटीचे प्रकरण नको व्हायला हवं होतं, जो प्रकार झाला तो वाईट झाला. पण यापूर्वी सुद्धा पेपर फुटीचे प्रकार झालेले आहेत. परंतु विरोधकांनी सात दिवसांमध्ये एकदाही चर्चेत भाग न घेता केवळ गोंधळ घातल्याचे दानवे म्हणाले. विरोधकांना पेपरशी कोणताही घेणं देणं नाही. प्रसंग पडला तर प्रधानमंत्री सभागृहात येत असतात परंतु पूर्णवेळ कोणताही प्रधानमंत्री पूर्ण संपेपर्यंत सभागृहात बसून राहत नाही, असेही दानवे म्हणाले.

संजय राऊत यांनी लापता गृहमंत्री अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली होती. यावर देखील रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी लापता गृहमंत्री चित्रपट काढण्यापेक्षा अडीच वर्षाच्या कार्यकाळात मंत्रालयात गेलेला एक दिवसांचा मुख्यमंत्री हा चित्रपट काढावा आणि त्याचं डायरेक्टर शरद पवार यांना करावं अशी टीका दानवे म्हणाले. संजय राऊत यांना चॅनेल आणि वर्तमानपत्रांमध्ये यायचं असेल तर अशा प्रकारच्या बातम्या ते देत असतात. खरे गुंड यांच्याच पक्षात आहे अशी टीका दानवेंनी केली.

महाराष्ट्र ाच्या जनतेने मातीच राजकारण केलं आणि नको त्यांना मातीतच मिळवल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. मोदींची लोकप्रियता कमी आणि जास्त होणे हे संजय राऊत यांच्या हातात नाही असे दानवे म्हणाले. राज्याच्या राजकारणात कोणाची लोकप्रियता कमी झाली हे ज्याच्या आमदाराच्या संख्या बळावरून कळत असतं. यांची लोकप्रियता तर सोडा यांच्यासोबत राहणं आणि फिरणं म्हणजे लोक अपमान समजायला लागल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.

सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस टीका केली होती. यावर बोलताना दानवे म्हणाले की, अशा प्रकारची टीका एखाद्या राजकीय पक्षांना किंवा नेत्यांवर करणं योग्य नाही. सुनेत्रा पवार राजकारणामध्ये नवीन आहेत. अजितदादा गेल्यानंतर पोकळी भरून काढण्याचं काम पक्षाने त्यांच्याकडे दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या कामाचं मूल्यमापन असं करता येणार नाही. सुनेत्रा पवार यांचं अशा प्रकारचं वर्णन करणं ही काँग्रेसची पहिल्यापासून संस्कृती आहे, ते कधीच कुणाला चांगलं म्हणत नाहीत असे दानवे म्हणाले.

Comments are closed.