देवेंद्र फडणवीस अन् विखे पाटील आपल्याला फसवतायत, भाजप सरकार असेपर्यंत..; मराठा सेवा संघाचा आरोप
Maratha Seva Sangh on Manoj Jarange Patil : हैदराबाद गॅझेटीअर (Hyderabad Gazetteer) लागू करून आरक्षण(Maratha Reservation) मिळत नसतं, हे मनोज जरांगेंना 2 सप्टेंबरचा जीआर काढण्यापूर्वीच सांगितलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील, देवेंद्र फडणवीस आपल्याला फसवतायत. हे आम्ही जरांगेंना आधीच सांगितलं होतं. भाजपचं सरकार आहे तोपर्यंतच मराठा समाजाच SEBC आरक्षण टिकणार असल्याचे सांगत मराठा सेवा संघाचे (Maratha Seva Sangh) मुख्य प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे (Dr. Shivanand Bhanuse) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. ते बुलढाणा येथे बोलत होते. (Maratha Seva Sangh on Maratha Reservation)
Dr. Shivanand Bhanus: आम्ही गोलमेज परिषद घेऊन सांगितलं होतं की, विखे पाटील, फडणवीस आपल्याला फसवतायत
मराठा सेवा संघाने 1990 पासून जो लढा सुरू केला होता. मराठ्यांचं ओबीसीकरण, त्याच पद्धतीने हे आंदोलन सुरू होतं. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मी साक्षीदार आहे. सगे सोयरे हा मुद्दा आल्यावर आम्ही त्याला विरोध केला होता. मात्र दोन अडीच वर्षात त्याचं काय झालं हा प्रश्नच आहे. 2 सप्टेंबरचा जीआर निघण्यापूर्वी मी मुंबई त जाऊन सांगितलं होतं की, अशाप्रकारे हैदराबाद गॅझेटीयर काढून आरक्षण मिळत नसतं. आता 11 महिन्यानंतर जरांगे पाटील म्हणतायेत की सरकारने आम्हाला फसवलं. आम्ही गोलमेज परिषद घेऊन सांगितलं होतं की, विखे पाटील आणि फडणवीस आपल्याला फसवतायत. असेही डॉ.शिवानंद भानुसे म्हणाले.
Maratha Reservation: SEBC आरक्षण राजकीय सोडून ओबीसी सारखं करा, तरच त्याचा मराठा समाजाला फायदा
दरम्यान, आता त्याच मागण्या घेऊन 29 ऑगस्ट पासून जरांगे आंदोलन करणार आहेत. 58 लाख नोंदी राज्यभरातून ऑलरेडी मिळाल्या आहेत, त्यामुळे त्या आपण का मागत आहोत? काही प्रमाणपत्र मिळाले, व्हॅलिडीटीही मिळाल्या. मात्र ते 02 ते 03 टक्केच यश आहे. आता जर आपल्याला मागण्या करायच्या असतील तर तज्ञ मंडळी जसे पुरुषोत्तम खेडेकर, बीजी कोळसे पाटील यांना सोबत घेतलं पाहिजे. समाजाला तात्काळ आपण काय देऊ शकतो? याचा विचार जरांगे यांनी करायला पाहिजे. आज मराठा समाजाला SEBC सवलत मिळाल्याने इतर मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे भाजपचं सरकार आहे तोपर्यंतच SEBC आरक्षण टिकणार आहे. SEBC आरक्षण राजकीयसोडून ओबीसी सारखं करा, तरच त्याचा फायदा मराठा समाजाला होईल. असेही डॉ.शिवानंद भानुसे म्हणाले.
Dr. Shivanand Bhanus: …नाहीतर आपणही मागण्या हवेत करायच्या आणि सरकारही त्या हवेतच मंजूर करेल
सारथी संस्थेला तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी दिला पाहिजे. अण्णासाहेब पाटील महामंडळाला 5000 कोटी रुपये दिले पाहिजेत. अशा मागण्या करून समाजाच्या पदरात काहीतरी पाडलं पाहिजे. नाहीतर आपणही मागण्या हवेत करायच्या आणि सरकारही त्या हवेतच मंजूर करेल. आता ही तीन वर्षे गेलेत मागेही चाळीस वर्षे गेलेत ते जाऊ नये अशी विनंती करतो. असेही मराठा सेवा संघाचे प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे म्हणाले.
Comments are closed.