राष्ट्रवादीने रुपाली चाकणकरांचा उत्तराधिकारी निवडला, सुनील तटकरेंचा मोठा निर्णय, वैशाली नागवडे
NCP Vaishali Nagwade: राजकारणाची सुरुवात दिवंगत अजित पवार यांच्यामुळे झाली. आज ते हवे होते, त्यांची कायम उणीव जाणवत राहील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पत्र मिळाले. त्यामुळे आज जबाबदारी खुप वाढली आहे. दादांची ‘कामाचा माणूस’ ही ओळख आम्हाला आणखी तळागाळात घेऊन जायचं आहे. गेल्या 26 वर्षांचा हा प्रवास आहे. पंचायत समिती सदस्य, महानंद दूध डेअरी चेअरमन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पद, असे 14 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आहे. जबाबदारी मोठी समजून काम करायला हवं. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी (NCP State Womens President) वैशाली नागवडे (Vaishali Nagwade) यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज (बुधवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी (NCP State Womens President) वैशाली नागवडे यांची, तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे (Nikhil Thackeray) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना खासदार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांनी हि प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्ष निखिल ठाकरे यांची निवड झाल्यानंतर या दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्यालयात जाऊन अजितदादांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाबत काँग्रेसने केलेल्या टीकेबाबत बोलताना वैशाली नागवडे म्हणाल्या की, पुणे शहरात आम्ही काल या विरोधात आंदोलन केलं. शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा जपणारा महाराष्ट्र आहे. काँग्रेसला सुनेत्रा पवार यांचं दुःख कळायला हव, हे अजिबात शोभणारे नाही. किती मोठ दुःख पचवून त्या कशा प्रकारे पदावर आल्या, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्यबाबत जबाबदारीने बोलणं गरजेचे होतं. एकीकडे बारामतीमध्ये विधानसभेला मदत केली म्हणायचं आणि दुसरीकडे अशा प्रकारे टीका करायची हे काँग्रेसला शोभणारे नाही असेही महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे म्हणल्या.
आज अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली आहे. मोठी जबाबदारी आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहत असतो. संघटना ही नेत्याचा स्वाभिमान असतो. त्यांतून सूरज चव्हाण यांची घटना घडली होती. पुनः असं काही होणार नाही. अशी प्रतिक्रिया निखिल ठाकरे यांनी दिली.
महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे नेमक्या कोण?
पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट).
पद: महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष.
जन्मतारीखः 11-02-1973
शिक्षणः बी.कॉम (एस. पी. कॉलेज)
2002-05 – संचालक – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
2005-2016 – संचालक- महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)
2007 – 2012- सदस्य – पंचायत समिती, दौंड
2009- 2021- अध्यक्ष- पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस
2010 – अध्यक्ष- पंचायत राज कमिटी, महाराष्ट्र राज्य
2013 – 2016- अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)
2014 – 2016- संचालक NDDB – नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंद, गुजरात
2014 – 2016- संचालक IVRI – इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट, बरेली, उ.प्र.
Comments are closed.