समृद्धी महामार्ग बांधताना 100 कोटींचा घोटाळा, परभणीत कृषी खात्यातील 7 अधिकारी निलंबित; नेमकं का
परभणी: परभणी जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. परभणीच्या सेलूतील कृषी विभागाचे 7 अधिकारी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी ते कृषी पर्यवेक्षकापर्यंतचे 7 जण निलंबित करण्यात आले आहेत. कृषी विभागाचे कक्ष अधिकारी नितीन शेळके यांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. जालना- नांदेड समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीवरील वृक्षांचे मुल्यांकन चुकीच्या पद्धतीने वाढीव दिले होते असा ठपक या निलंबित अधिकाऱ्यांवरती आहे. 2022-23 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या प्रकरणात चौकशी केली होती. चौकशी अंती शासनाकडून संबंधित सात अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
जालना समृध्दी महामार्गाची घोषणा झाली. या मार्गासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्यासाठी जी यत्रंणा असते, त्याचबरोबर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या मार्गावरील वृक्ष संख्या किती आहे, याचा मूल्यांकन केलं जातं. हे मूल्यांकन अतिशय चुकीच्या पद्धतीने या अधिकाऱ्यांनी दिलं होतं, असा आरोप त्यांच्यावरती होता. या मार्गावरील वृक्षांचं मूल्यांकन होतं, ते तपास अधिकारी आंचल गोयाल यांनी यांनी सांगितलं की, 100 कोटी रुपयांचा मूल्यांकन जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील केवळ परभणी जिल्ह्यातील या रस्त्यावरती झालेल्या वृक्षांवरती देण्यात आलेलं होतं. ते अतिशय चुकीचं होतं. या प्रकरणात त्यांनी फेर चौकशी केली आणि पाहणी केली त्यानंतर त्यांनी या अधिकाऱ्यांनी वाढीव मूल्यांकन दिल्याचं समोर आलं आहे.
शंभर कोटी रुपये दिलेल्या या वृक्षांच्या मूल्यांकनासाठी नऊ ते दहा कोटी रुपयांमध्ये बसत होतं. यावरूनच अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी या निलंबनाच्या आदेश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. पहिल्यांदाच अशा पद्धतीची मोठी कारवाई होत आहे. यामध्ये कृषी विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यापासून ते कृषी पर्यवेक्षकांपर्यंत जवळपास सात जणांना एकाच वेळी निलंबित करण्यात आला आहे. यानंतर आता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार का हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये संयुक्त पाहणी त्याच्या अहवाल महसूल विभाग, कृषी विभाग यांच्याकडून देण्यात येतो त्यानुसार हा अहवाल चुकीचा होता त्यावरती आता कारवाई करण्यात आलेली आहे.
निलंबित करण्यात आलेले अधिकारी
1)उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र हरणे,
2)तालुका कृषी अधिकारी शेरन ताजमोहंमद पठाण,
3)रामप्रसाद जोगदंड मंडळ कृषी अधिकारी चिकलठाणा,
4)अशोक कदम कृषी अधिकारी सेलू,
5)राजहंस खरात मंडळ कृषी अधिकारी,
6)प्रकाश लोहार कृषी पर्यवेक्षक,
7)दिगंबर फुलारी कृषी पर्यवेक्षक सेलू
अधिक पाहा..
Comments are closed.