फ्लोरल डिझाईन मेहंदी





भारतीयांना सगळेच सण उत्सव साजरे करायला आवडतात. यामुळे आपल्याकडे कोणत्याही लहान मोठ्या उत्सवात जशी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते तशीच महिला हातावर मेहंदी काढण्याची हौसही याच दिवसात पूर्ण करतात. विशेष करून उत्तेरकडील राज्यात श्रावणात हातावर मेहंदी काढणे शुभ मानले जाते. आता ट्रेंड महाराष्ट्रातही आलाय. यामुळे आपल्याकडेही आता वर्षाचे १२ ही महिने मेहंदी आर्टीस्ट उपलब्ध असतात. आज आपण मेहंदीच्या अशाच सोप्या डिझाईन बघणार आहोत.

फिंगर डिझाईन

तळहातावर मेहंदी काढल्यानंतर बोटावर आणि बोटांच्या टोकावर मेहंदी लावली जाते. त्यामुळे तळहातावरची मेहंदी खुलून दिसते.

मांडला डिझाईन

मांडला डिझाईन चा सुंदर पॅटर्न तुम्ही तळहाताबरोबरच्या हाताच्या मागच्या बाजूवरही काढू शकता.मध्यभागी गोल आकार काढून त्यावर बारीक नक्षीकाम करू शकता. ही डिझाईन बघताना मंडल म्हणजे गोलाकार असते. म्हणून तिला मांडला डिझाईन असे म्हणतात.

सरळ रेषेतील डिझाईन
हाताच्या मागे सरळ रेषेत काढलेले मेहंदी डिझाईन शोभून दिसते. त्यात जर तुम्ही बोटात मोठी डिझाईनर अंगठी घातली तर हात अजून सुंदर दिसतो. लग्न, पार्टी, किंवा लहान मोठ्या इवेंटमध्ये असे मेहंदी डिझाईन काढले जातात.

सोपी डिझाईन

ज्यांना मेहंदी लावता येत नसेल त्यांच्यासाठी सोपी डिझाईनचे ऑपश्न आहे. हातावर शोभून दिसणाऱ्या या डिझाईन तुम्ही काही मिनिटातच काढू शकता.

रोज डिझाईन
काहींना फूलांची फार आवड असते. अशासांठी मेहंदीमध्ये रोझ म्हणजेच गुलाबाचे डिझाईन हे खूप छान ऑपश्न आहे. कारण या डिझाईन काढण्यास सोप्या तर असतात शिवाय हातावर छान खुलून दिसतात.



Comments are closed.