ब्लॅक की कॅपेचिनो? तुमच्या कॉफीच्या निवडीत दडलाय तुमचा स्वभाव
सकाळची एक गरमागरम कॉफी अनेकांसाठी दिवसाची सर्वोत्तम सुरुवात असते. पण तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही कोणत्या प्रकारची कॉफी पिणं पसंत करता, यावरून तुमच्या स्वभावाबद्दलही काही अंदाज बांधले जाऊ शकतात? काही मानसशास्त्रीय अभ्यासांनुसार, आपल्या दैनंदिन सवयी आणि आवडी-निवडी आपल्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू दर्शवू शकतात. अर्थात, हे निष्कर्ष प्रत्येक व्यक्तीला तंतोतंत लागू होतीलच असं नाही, मात्र हा विषय नक्कीच रंजक आहे.
कॉफी आणि व्यक्तिमत्त्वाचा संबंध
मानसशास्त्राशी संबंधित काही अभ्यासांमध्ये असे सांगितले गेले आहे की, अन्नपदार्थ आणि पेयांची निवड आपल्या विचारसरणी, निर्णय घेण्याची पद्धत आणि लाइफस्टाईशी काही प्रमाणात संबंधित असू शकते. त्यामुळे तुमची आवडती कॉफी तुमच्या स्वभावाची छोटीशी झलक दाखवू शकते.
1) ब्लॅक कॉफी आवडते?
जर तुम्ही ब्लॅक कॉफीचे चाहते असाल, तर तुम्ही साधेपणा पसंत करणारे, स्पष्टवक्ते आणि धाडसी स्वभावाचे असू शकता. अशा व्यक्तींना अनावश्यक गुंतागुंत आवडत नाही आणि त्या थेट मुद्द्यावर बोलणं पसंत करतात.
२) कॅपॅसिनो/फोम कॉफी
ज्यांना भरपूर फेस असलेली कॅपेचिनो किंवा फोम कॉफी आवडते, ते अनेकदा शिस्तप्रिय, व्यवस्थित आणि प्रत्येक गोष्टीतील बारकावे लक्षात घेणारे असू शकतात. नियोजन करून काम करणं त्यांना आवडतं.
3) लाते (Latte) आवडणारे
लाते कॉफीची मऊ आणि क्रीमी चव आवडणारे लोक सहसा शांत, मैत्रीपूर्ण आणि इतरांची काळजी घेणारे असतात. अनेकदा ते इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही वेळा ते गरजेपेक्षा जास्त चिंता करण्याकडेही झुकतात.
4) इंस्टंट कॉफी लव्हर्स
इंस्टंट कॉफी आवडणारे लोक आयुष्याकडे रिलॅक्स दृष्टिकोनातून पाहणारे असू शकतात. त्यांना गोष्टी सोप्या पद्धतीने करायला आवडतात. मात्र, काही अभ्यासांनुसार अशा व्यक्तींमध्ये काम पुढे ढकलण्याची सवयही दिसू शकते.
हे कितपत खरं आहे?
तज्ज्ञांच्या मते, कॉफीची निवड आणि व्यक्तिमत्त्व यामधील संबंध हा एक मनोरंजक निरीक्षणाचा विषय आहे. मात्र, केवळ कॉफीच्या प्रकारावरून एखाद्याचा स्वभाव निश्चित करता येत नाही. व्यक्तिमत्त्वावर अनुभव, संस्कार, वातावरण आणि जीवनशैली यांचाही तितकाच प्रभाव असतो.
Comments are closed.