Mirror Post-It Rule : स्किनकेअर विसरता? ‘मिरर पोस्ट-इट रूल’ बनवेल तुमचं ब्युटी रूटीन
धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे ऑफिस, घर, मुलं आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये अनेक महिलांना स्वतःसाठी वेळ काढणं कठीण जातं. महागडे स्किनकेअर प्रॉडक्ट्स विकत घेतले जातात, पण त्यांचा नियमित वापर मात्र राहून जातो. सकाळची घाई असो किंवा रात्रीचा थकवा, फेसवॉश, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन किंवा नाईट क्रीम लावणं अनेकदा विसरलं जातं.
काहीजण यासाठी मोबाईलमध्ये अलार्म लावतात, पण सततच्या नोटिफिकेशन्समध्ये तोही दुर्लक्षित होतो. अशा वेळी सोशल मीडियावर लोकप्रिय होत असलेला ‘मिरर पोस्ट-इट रूल’ तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो.
काय आहे ‘मिरर पोस्ट-इट रूल’?
हा अतिशय सोपा आणि प्रभावी सवय निर्माण करणारा उपाय आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक छोटासा रंगीत पोस्ट-इट नोट घ्यायचा आहे आणि तो बाथरूमच्या आरशावर, ड्रेसिंग टेबलच्या मिररवर किंवा जिथे तुमची नजर वारंवार जाते अशा ठिकाणी चिकटवायचा आहे.
त्या नोटवर तुमच्या स्किनकेअरच्या स्टेप्स थोडक्यात लिहा, जसे की क्लींज, टोन, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, नाईट क्रीम मोठा संदेश लिहिण्याची गरज नाही. काही छोटे शब्दही तुमच्या मेंदूला योग्य वेळी आठवण करून देतात.
हा नियम इतका प्रभावी का?
आपण दिवसातून अनेक वेळा आरशात पाहतो. सकाळी तयार होताना, केस विंचरताना, हात धुताना किंवा झोपण्यापूर्वी आरशाकडे नजर जातेच. त्यामुळे आरशावर दिसणारा छोटासा नोट तुमच्या स्किनकेअरची नैसर्गिक आठवण करून देतो. वेगळा अलार्म किंवा अॅप उघडण्याची गरज पडत नाही.
स्किनकेअरची सवय
अनेक जण उत्साहाने स्किनकेअर रूटीन सुरू करतात, पण काही दिवसांनी सातत्य राहत नाही. अशावेळी हा मिरर रूल रोज दिसत असल्यामुळे हळूहळू स्किनकेअर ही सवय बनू लागते. नियमितपणा वाढतो आणि कोणतीही स्टेप विसरण्याची शक्यता कमी होते.
पोस्ट-इट नोट कुठे लावावी?
जिथे दिवसातून अनेकदा तुमची नजर जाते, अशा ठिकाणी नोट लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो.
– बाथरूमच्या आरशावर
– ड्रेसिंग टेबलच्या मिररवर
– वॉर्डरोब किंवा कपाटाच्या आरशावर
– मेकअप सेक्शनसमोर
Comments are closed.