वयाच्या ४५ नंतरची लाईफस्टाईल
वयाच्या ४५ वर्षांनंतर आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू होतो. या काळात दांपत्याने केवळ शारीरिक आरोग्याचाच नाही, तर मानसिक, भावनिक आणि आर्थिक आरोग्याचाही विचार करणे गरजेचे असते. कारण या वयातच योग्य जीवनशैली स्वीकारल्यास हा काळ अधिक आनंदी, निरोगी आणि समाधानकारक ठरू शकतो. या वयापर्यंत संसारही बऱ्यापैकी झालेला असतो. पैशाचे , नातेसंबंधाचे महत्वही समजलेले असते. मुलं बऱ्यापैकी मोठी व शहाणी झालेली असतात. आजच्या काळात तर मुलं भावनेपेक्षा व्यवहारांना जास्त महत्व देतात. त्यामुळे आईवडिलांनीही अनावश्यक खर्च टाळावा. पूर्वीप्रमाणे पार्टया, कार्यक्रम, गावजेवणावरचा खर्च टाळावा. भपकेबाजपणाच्या मागे लागून जमा असलेले पूंजी वाया घालवू नये. मुलांनाही आर्थिक शिस्तीचे महत्व सांगावे. साधे सरळ जीवन जगावे. म्हणजे कधीही कोणापुढेही हात पसरण्याची वेळ येत नाही. वयाची पंचेचाळीशी ही उतारवयाची सुरुवात नसून, अधिक परिपक्व, समंजस आणि आनंदी सहजीवनाचा नवा अध्याय असू शकतो. निरोगी आरोग्य, सुदृढ नाते, योग्य आर्थिक नियोजन आणि सकारात्मक विचार यांमुळे हा प्रवास अधिक सुंदर बनतो. life after 45 years for couples
१. आरोग्य
संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे चालणे, योग, पोहणे किंवा सायकलिंग करा.
नियमित आरोग्य तपासण्या करून रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलची तपासणी करा.
दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे महत्वाचे असते.
२. नाते
दररोज काही वेळ एकमेकांसाठी राखून ठेवा.
मनातील भावना, अपेक्षा आणि भविष्यातील योजना यांबद्दल मोकळेपणाने संवाद साधा.
एकमेकांचे कौतुक करा आणि छोट्या-छोट्या गोष्टींमधून प्रेम व्यक्त करा.
अधूनमधून फिरायला जा, छंद जोपासा आणि एकत्र नवीन अनुभव घ्या.
3. आर्थिक नियोजन
निवृत्तीचे नियोजन वेळेत सुरू करा.
आरोग्य विमा आणि आपत्कालीन निधी तयार ठेवा.
अनावश्यक कर्ज टाळा आणि भविष्यातील खर्चाचा विचार करून बचत करा.
४. मानसिक आणि भावनिक आरोग्य जपा
ध्यान, प्राणायाम किंवा मेडिटेशनचा सराव करा.
मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांशी नियमित संपर्क ठेवा.
नवीन कौशल्ये शिका, पुस्तके वाचा किंवा आवडीचे छंद जोपासा.
तणावाच्या काळात एकमेकांना दोष देण्याऐवजी आधार द्या.
५. सक्रिय आणि आनंदी राहा
शक्य असल्यास प्रवास करा.
समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी व्हा.
मुलं आणि नातवंडांसोबत वेळ घालवा, पण स्वतःच्या आवडी-निवडीही जपा.
६. वैवाहिक जवळीक जपा
वय वाढले तरी प्रेम, आपुलकी आणि शारीरिक जवळीक यांचे महत्त्व कमी होत नाही.
आरोग्याशी संबंधित अडचणी असल्यास त्याबद्दल मोकळेपणाने चर्चा करा आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Comments are closed.