ठिय्या आंदोलनातून राहुल गांधींना फरफटत नेले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे फोटो आले समोर




नरेंद्र मोदींच्या घराच्या परिसरात ठिय्या आंदोलन करणाऱ्या राहुल गांधींना दिल्ली पोलिसांनी फरफटत नेले


नवी दिल्ली : जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज (21 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत मंत्री जितेंद्र सिंह राहुल गांधी यांच्या भेटीला आले आणि त्यांनी राहुल गांधी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी काँग्रेसने त्यांच्या X या समाज माध्यमावर पोस्ट करत ‘चलो पीएम हाऊस’ अशी देशवासीयांना हाक दिली. त्यामुळे पंतप्रधान निवासस्थानासमोरील आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा, वर्षा गायकवाड आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे फोटो आता समोर आले आहेत.



Comments are closed.