28 की 29 जुलै, यंदा गुरुपौर्णिमा नेमकी कधी?

गुरु आणि शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ‘गुरु पौर्णिमा’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी गुरुची पूजा केली जाते. महर्षी वेद व्यासांचा जन्म याच दिवशी झाला असल्याने या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ किंवा ‘वेद पौर्णिमा’ असेही म्हणतात. गुरू हा केवळ शिक्षण, ज्ञान देणारा व्यक्ती नसून अंधारातून प्रकाशात नेणारा एक मार्गदर्शक आहे. त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य गुरुप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र, यंदा गुरुपौर्णिमा 28 की 29 जुलै याबाबत संभ्रम दिसून येत आहे. त्यामुळे 2026 या वर्षांत गुरुपौर्णिमा कधी असणार आहे? जाणून घेऊयात,  guru purnima date 2026

गुरुपौर्णिमा मुहूर्त –

हिंदू पंचांगानुसार आषाढ पौर्णिमेची सुरुवात 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी होत आहे. ही तिथी 29 जुलै रोजी रात्री 8 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणताही सण साजरा करताना उदय तिथीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे यंदा गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.

विधी

  • गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  • यानंतर पुजास्थळी गंगाजल शिंपडावे.
  • पुजास्थळी ज्या गुरूची पूजा करणार आहात त्यांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.
  • यानंतर गुरु मंत्राचा जप करावा.
  • धूप दिवा लावावे.
  • सर्वात शेवटी गुरूची आरती करावी.
  • गुरूला नैवेद्य दाखवावा.

या गोष्टी महत्त्वाच्या –

गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुच नाही तर कुटूंबातील जेष्ठ व्यक्तींनाही तुम्ही गुरु मानून त्याच्याप्रती आदर व्यक्त करू शकता.
गुरुकडून उन्नतीचा मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो.
या दिवशी तुम्ही तुमच्या गुरुचे आवडते कार्य किंवा त्यांची सेवा करू शकता.

हेही वाचा – पायात जोडवी, बिचवे आणि मासोळी परिधान करण्यामागची रंजक कारणे!

Comments are closed.