झोपण्याच्या विचित्र सवयी असलेले प्राणी

माणसांना झोपण्यासाठी मऊ गादी आणि उशी लागते, पण प्राण्यांच्या जगात मात्र झोपण्याचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत. प्राण्यांच्या विश्वात असे काही विचित्र जीव आहेत, ज्यांच्या झोपण्याच्या सवयी वाचून तुम्ही थक्क व्हाल. कोणी पाण्यात पोहत झोपतं, कोणी एका पायावर उभं राहून, तर कोणी चक्क हवेत उडतानाच झोपतं. प्राण्यांच्या जगातल्या या अनोख्या प्राण्यांविषयी जाणून घेऊयात.  animal weird sleeping habits

डॉल्फिन माश्याची झोपण्याची सवय फारच रंजक आहे. झोपताना त्यांच्या मेंदूचा फक्त अर्धाच भाग एका वेळी झोपतो तर दुसरा अर्धा भाग जागा राहतो. यामुळे ते तरंगू शकतात.
सी ओटर्स समुद्रात पाठीवर तरंगत झोपतात आणि विशेष म्हणजे झोपताना एकमेकांपासून दूर जाण्यापासून वाचण्यासाठी एकमेकांचे हात धरतात.
अल्पाइन स्विफ्ट पक्षी उडतानाच झोपतात. हे पक्षी 120 दिवस सलग उडतात आणि उडतानाच लहानशी डुलकी घेतात.
हत्ती दिवसातून फक्त 2 ते 4 तासच झोपतात. अनेकदा तर ते उभे राहूनच झोपतात.
जिराफ दिवसाला फक्त 4 ते 5 तास झोपतात. तसेच ते उभे राहून झोपतात.
एक डोळा उघडे ठेवून बदके झोपतात.
काही गोड्या पाण्यातील कासव महिनोन्महिने पाण्याखाली निद्रेत जातात
वॉलरस हा सागरी प्राणी सुमारे 84 तास झोप न घेता जगू शकतो. पण जेव्हा झोपतो तेव्हा जमिनीवर विविध स्थितीत झोपू शकतात.
स्लॉथ हा आळशी प्राणी आहे. हा प्राणी 15 ते 20 तास झाडाच्या फांद्याना उलटे लटकून झोपतो.

हेही वाचा – भारतीय घरात ‘पाहुणे येणार’ म्हटलं की सुरू होणाऱ्या 10 गोष्टी

Comments are closed.