Smartwatch Cancer Risk : सावधान! स्मार्टवॉच घातल्याने कॅन्सर होतो? तज्ज्ञ सांगतात की…




स्मार्टवॉच घातल्याने कॅन्सर होतो


आज स्मार्टवॉच ही केवळ वेळ पाहण्याची वस्तू राहिलेली नाही. तर दिवसभर किती पावले चाललो, हृदयाचे ठोके किती आहेत, झोप किती झाली, व्यायाम किती केला यापासून अनेक गोष्टींची माहिती तो देते. त्यामुळे काही जण स्मार्टवॉच 24 तास मनगटावर ठेवतात, अगदी झोपतानाही. पण याच सवयीमुळे सोशल मीडियावर एक प्रश्न वारंवार उपस्थित होतोय तो म्हणजे स्मार्टवॉचमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सरचा धोका वाढतो का? आता याचं उत्तर समजून घेण्यासाठी अफवांपेक्षा उपलब्ध वैज्ञानिक माहिती समजून घेणं महत्त्वाचं आहे.

स्मार्टवॉचमधून कोणतं रेडिएशन निघतं?
ब्लूटूथ, वायफाय किंवा मोबाइल कनेक्शनसाठी स्मार्टवॉच रेडिओफ्रिक्वेन्सी म्हणजेच RF ऊर्जा वापरते. हे नॉन आयोनायझिंग रेडिएशन आहे. एक्स रे किंवा गॅमा किरणांसारख्या आयोनायझिंग रेडिएशनपेक्षा त्याची ऊर्जा खूप वेगळी असते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार, नॉन आयोनायझिंग RF रेडिएशनमुळे डीएनएला थेट नुकसान होऊन कॅन्सर होतो, अशी यंत्रणा सध्या सिद्ध झालेली नाही.

स्मार्टवॉचमुळे कॅन्सर होतो
तज्ज्ञांच्या मते, स्मार्टवॉच वापरल्याने कॅन्सर होतो, असा ठोस निष्कर्ष नाही. म्हणून ‘स्मार्टवॉच घातलं की कॅन्सर होतो’ असा थेट दावा करणे योग्य ठरणार नाही.

तरीही काय काळजी घ्यावी?
स्मार्टवॉचमुळे कॅन्सर होतो हे सिद्ध झालेले नसले तरी कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण सतत वापरण्याची गरज आहेच असे नाही. विशेषतः झोपताना ते काढून ठेवणे काही लोकांसाठी अधिक आरामदायक ठरू शकते. स्मार्टवॉच वापरताना बॅटरी, चार्जिंग, त्वचेवर होणारी जळजळ किंवा घट्ट पट्टा यांसारख्या गोष्टींकडेही लक्ष द्या. सतत घालून ठेऊ नका. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पेसमेकर किंवा इतर इम्प्लांटेड कार्डियाक उपकरण असेल, तर काही स्मार्टवॉचमधील मजबूत मॅग्नेटमुळे त्रास होण्याची शक्यता असते.



Comments are closed.