नात्यात आनंदी राहायचयं ? मग सोशल मीडियावर पोस्ट करू नका या गोष्टी
हल्ली सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. यामुळे दैनंदिन आयुष्यातल्या लहान सहान गोष्टी, मोठा इवेंट ते अगदी जोडीदाराबरोबरचा वाद सगळ काही सोशल मीडियावर शेअर करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. पण यामुळे तुमचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतो हे देखील कपल्सला समजायला हवे.
वादविवाद
जोडप्यांमध्ये कुरबुरी होणं, छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद होणं ही सामान्य बाब आहे. पण त्याबदद्ल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणं डोकेदुखीच कारण ठरू शकतं. तुमच्या नात्यात दुरावा आलाय हे बघूनच तुमच्या हितशत्रूंना आयतचं कोलीत हातात मिळत. तुमच्यातील भेद आणखील कसे वाढतील याचा ते प्रयत्न करु शकतात. त्यामुळे सोशल मीडियावर अशा कुरबुरी शेअर करू नयेत.
जोडप्याचे ध्येय
तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर किती आनंदात आहात हे सगळ्यांना सांगण्याची गरज नसते. कारण त्याच्याशी इतरांना काहीही देणं घेणं नसत. पण तरीही अनेक कपल्स हॅपी मुवमेंटस सोशल मीडियावर शेअर करतात. आमचा रुटीन कसा आहे त्यासाठी आम्ही गोल्स कोणते ठेवलेत हे देखील काहीजण शेअर करतात.या चुका करू नयेत.
भेटवस्तू
काही कपल आपला जोडीदार आपल्याला किती महागडे गिफ्ट देतो हे सोशल मीडियावर सांगत सुटतात. तुमच्या त्या गिफ्टशी कोणालाही काही देणघेण नसते. कारण त्या तुमच्या खासगी गोष्टी असतात.
क्षण
काही कपल्स आपला जोडीदार आपल्यासाठी किती काही करतोय हे देखील शेअर करतात. त्यासाठी तो आपल्याला कुठे फिरायला नेतो त्यापासून ते त्याने आपल्यासाठी किती महागड घर घेतलं गाडी घेतली पार्टी दिली. घरकामात मदत केली हे देखील शे्अर करतात. याचा परिणाम दुसऱ्या कपलवर होऊ शकतो. कारण असे अनेक कपल्स असतात ज्यांना आपल्या पार्टनरसाठी खूप काही करायचं असतं. पण पैसा आणि वेळ यात ते कमी पडत असतात पण प्रयत्न करत असतात.
Comments are closed.